Mahatma Phule Karj Yojana : एकाच वर्षात दोनदा कर्जाची उचल करणाऱ्या शेतकऱ्यांनाही ५० हजारांचा मिळणार लाभ

Farmer Anudan : महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून ५० हजार रुपये देण्याचे घोषणा जाहीर करण्यात आली.
Mahatma Phule Karj Yojana
Mahatma Phule Karj Yojanaagrowon
Published on
Updated on

Agriculture News : महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून ५० हजार रुपये देण्याचे घोषणा जाहीर करण्यात आली. दरम्यान मागच्या वर्षभरात राज्यातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर दोन टप्प्यात पैसे देण्यात आले. परंतु राज्यातील अद्याप काही पात्र लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला नाही. यावर आता राज्य सरकारकडून पुढच्या काही दिवसात तिसरी यादी लवकरच जाहीर करून खात्यावर पैसे जमा करण्याच्या तयारीत आहे.

यामध्ये नियमीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नव्हता तसेच तांत्रिक अडचणीमुळे एकाच आर्थिक वर्षात दोनदा उचल दिसल्याने अपात्र ठरलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित रहावं लागलं होते.

यावर आता सरकारने नवा नियम करत दोनदा उचल करणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा लाभ मिळणार असल्याची माहिती दिली. याबाबतची माहिती राज्य शासनाने मागवली आहे.

यावर आज (दि.२९) जिल्हा उपनिबंधक कार्यालयात विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान दिले. बहुतांशी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा झाला; पण तांत्रिक अडचणीमुळे काहीजण अनुदानापासून वंचित राहिले होते.

Mahatma Phule Karj Yojana
Mahatma Phule Yojana : लोकसभेपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पन्नास हजार रुपये : अजित पवार

पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यातील बहुतांशी शेतकरी मार्चपूर्वी कर्जाची परतफेड करतात. मात्र, हे करत असताना एकाच आर्थिक वर्षात दोनदा उचल दिसत असल्याने त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळाला नव्हता.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेत ही तांत्रिक अडचण सहकार विभागाच्या निदर्शनास आणून दिल्यावर शासनाने अध्यादेशात अंशता बदल केला. या निर्णयामुळे १४ हजार ८०० शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com