Mahatma Phule Yojana : लोकसभेपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पन्नास हजार रुपये : अजित पवार

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निडणुकीपूर्वी वंचित शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 हजार जमा करण्याची ग्वाही दिली.
Mahatma Phule Yojana
Mahatma Phule Yojanaagrowon

Ajit Pawar In Kolhapur : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती प्रोत्साहन अनुदान योजनेंतर्गत नियमीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान शेतकऱ्यांना दोन टप्प्यात खात्यात अनुदान देण्यात आले परंतु तिसऱ्या टप्प्यातील लाभार्थीना अद्यापही अनुदान न मिळाल्याने हजारो शेतकरी यापासून वंचीत आहेत.

दरम्यान यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर वंचित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची ग्वाही दिली. ते कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, जिथे जिथे शेतकऱ्यांना डायरेक्ट इन डायरेक्ट मदत होईल ती मदत करण्याची आमची भूमिका आहे. मला वारंवार विचारणा होतेय वंचित शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ देण्याबाबत काय झालं आम्ही मागे महाआघाडीचे सरकार असताना वेळेत कर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान जाहीर केले.

दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांना आणि कर्जमाफी केली. परंतु 70 हजार हून अधिक शेतकरी या योजनेपासून अद्यापही वंचित राहिलेले आहेत. यामध्ये सर्वाधित कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याने मी यामध्ये विशेष लक्ष घालणार असल्याची माहिती पवार यांनी दिली.

एका आर्थिक वर्षात दोन वेळेला कर्जाची उचल आणि तारखेचा घोळ या कारणास्तव काही शेतकरी आणि जास्तीत जास्त कोल्हापूर मधले शेतकरी हे तिथे वंचित आहेत चालू वर्षात पडलेल्या दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे. शेतकरी मोडला तर राज्य मोडेल आणि त्याच्यामुळे त्या शेतकऱ्याला पुन्हा ताटपणे उभा करण्याच्या आमचा प्रयत्न आहे.

Mahatma Phule Yojana
Ajit Pawar Kolhapur : अजित पवारांनी गोकुळचे कौतुक केले अन् गोकुळ अध्यक्षांनी शरद पवारांचे, नेमकं काय घडलं?

धनंजय मुंडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मी तुम्हाला शब्द देतो की लोकसभेची आचारसंहिता सुरू व्हायच्या आत या शेतकऱ्यांचे खात्यात पन्नास हजार रुपये देण्याचा आम्ही ग्वाही देत असल्याचे पवार म्हणाले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज (ता. १०) गडहिंग्लज व चंदगड दौऱ्यावर आले होते. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व घड्याळ चिन्ह मिळाल्यानंतर होणाऱ्या त्यांच्या दौऱ्याला राजकीयदृष्ट्या विशेष महत्व आले आहे. आमदार राजेश पाटील यांनी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांना त्यांनी उपस्थिती लावली. या दौऱ्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री धनंजय मुंडे, खासदार संजय मंडलिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com