Farmer Protest: चोखा सागरचे पाणी मिळण्यासाठी शेतकऱ्यांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा

Agriculture Water Demand: बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यातील संत चोखासागर प्रकल्पाचे पाणी डाव्या बाजूच्या कालव्याद्वारे अंढेरा व परिसरातील गावांना दिले जावे या व इतर मागण्यांसाठी शेतकरी पुन्हा आक्रमक झाले.
Farmer Issue
Farmer IssueAgrowon
Published on
Updated on

Buldana News : बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यातील संत चोखासागर प्रकल्पाचे पाणी डाव्या बाजूच्या कालव्याद्वारे अंढेरा व परिसरातील गावांना दिले जावे या व इतर मागण्यांसाठी शेतकरी पुन्हा आक्रमक झाले असून, रविवारपासून (ता.२६) आंदोलनाचा इशारा दिला आहे.

डिसेंबर २०२४ महिन्यात केलेले आंदोलन प्रशासनाने आश्‍वासन देत सोडवले होते. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने शेतकरी पुन्हा आंदोलन करणार आहेत. याबाबत तहसीलदारांमार्फत प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

Farmer Issue
Farmer Protest: वीस जिल्ह्यांत लाक्षणिक उपोषणाद्वारे केंद्र सरकारचा निषेध

संत चोखासागर प्रकल्पातील शिल्लक पाणी खडकपूर्णा नदीत सोडले जाते. हे पाणी संत चोखामेळा सागरातील डाव्या बाजूच्या कालव्याद्वारे सोडल्यास त्यामुळे परिसरात हरितक्रांती होईल. अंढेरा, शिवणी आरमळ, धोत्रा नंदई, सुरा, नागनगाव, पाडळीशिंदे, सावखेड नागरे, मेंडगाव, बायगाव, गुंजाळा, आसोला, सेवानगर अशी गावे आणि त्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायमचा सुटेल.

Farmer Issue
Farmers Protest Update : केंद्र सरकार अखेर नरमले, शेतकऱ्यांशी चर्चा करणार

तसेच या गावांचे हजारो हेक्टर क्षेत्र बारमाही सिंचित होऊन परिसर सुजलाम् सुफलाम् होईल. यासाठी शेतकरी लढा देत आहेत. शिवणी आरमाळ लघू प्रकल्पाचे नामकरण हे श्री आनंद स्वामी लघू प्रकल्प करावे, शिवणी आरमाळ लघू प्रकल्पाचे पिचिंग व भिंतीवरील झाडेझुडपे नष्ट करावीत, संत चोखासागर प्रकल्पातील पाण्याने अंढेऱ्याचा रामेश्वश्‍वर लघू प्रकल्प, असोला अंढेरा गुंजाळा लघू प्रकल्प, लघू प्रकल्प, शिवणी आरमाळ लघू प्रकल्प आदी लघू प्रकल्प भरावेत.

गेल्या महिन्यात केलेल्या उपोषणाची दखल घेत प्रशासनाने मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिला, परंतु पुढे त्याचे काहीही झालेले नाही. त्यामुळे प्रजासत्ताक दिनापासून कैलास नागरे व शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला. २० डिसेंबर २०२४ रोजी दिलेल्या लेखी पत्राप्रमाणे युद्धपातळीवर ध्येयधोरणे आखून त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी रेटून धरली आहे. शिवणी आरमाळ लघुप्रकल्प क्षेत्रात बेमुदत अन्नत्याग उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com