Water Storage : छत्रपती संभाजीनगरमधील ७ लघू प्रकल्प कोरडे

Water Stock : मराठवाड्यातील ७५१ लघू प्रकल्पांपैकी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७ प्रकल्प कोरडे असून २८ लघू प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.
Water Storage
Water StorageAgrowon
Published on
Updated on

Water Storage : मराठवाड्यातील ७५१ लघू प्रकल्पांपैकी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७ प्रकल्प कोरडे असून २८ लघू प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. जोत्याखाली पाणीसाठा असलेले सर्वाधिक १६ प्रकल्पही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातीलच आहेत. त्यामुळे यंदा एकूण पाऊस चांगला झाला असला तरी काही भागांत पाणी संकट कायम राहणार आहे.

मराठवाड्यातील २८ लघू प्रकलांतील पाणीसाठा जोत्याखाली असून त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील १६ प्रकल्पांसह जालन्यातील २, बीड व लातूरमधील प्रत्येकी एक व धाराशिवमधील ८ लघू प्रकल्पांचा समावेश आहे. जालना जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाग्रस्त नियोजनाचा भाग म्हणून ६८ गावशिवारातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवर परिणाम करणाऱ्या विहिरींमधील पाणी उपशावर जिल्हा प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे.

Water Storage
Water Storage : लघु प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखालीच

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोरडे व जोत्याखाली पाणीसाठा असलेले लघू प्रकल्प वगळता ४१ लघू प्रकल्पांत २५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे. १२ लघू प्रकल्पांत २५ ते ५० टक्‍क्‍यांदरम्यान, ८ प्रकल्पांत ५० ते ७५ टक्‍के तर केवळ १४ प्रकल्पांत ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त साठा आहे. जालना जिल्ह्यातील ५७ पैकी दोन लघू प्रकल्पांत २५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी, ८ प्रकल्पांत २५ ते ५० टक्‍क्‍यांदरम्यान, ४ प्रकल्पांत ५० ते ७५ टक्क्यांदरम्यान व ३४ प्रकल्पांत ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे.

बीड जिल्ह्यातील १२६ पैकी ८ प्रकल्पांत २५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे. याशिवाय १३ लघू प्रकल्पांत २५ ते ५० टक्क्यांदरम्यान, १२ लघू प्रकल्पांत ५० ते ७५ टक्‍के तर ९२ लघू प्रकल्पांत ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त साठा आहे.

लातूर जिल्ह्यातील १३५ लघू प्रकल्पांपैकी एका प्रकल्पात २५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी, ५ प्रकल्पांत २५ ते ५० टक्‍क्‍यांदरम्यान, १६ प्रकल्पांत ५० ते ७५ टक्क्यांदरम्यान तर ११२ प्रकल्पांत ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त साठा आहे. धाराशिव जिल्ह्यातील २०६ लघू प्रकल्पांपैकी २१ प्रकल्पांत २५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी साठा आहे.

Water Storage
Water Storage : ‘कासारी’ची पातळी खालावली

तर ३० प्रकल्पांत २५ ते ५० टक्‍क्‍यांदरम्यान, २७ प्रकल्पांत ५० ते ७५ टक्‍क्‍यांदरम्यान तर १२० प्रकल्पांत ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त साठा आहे. नांदेड जिल्ह्यातील ८० लघू प्रकल्पांपैकी एका प्रकल्पात २५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी, एका प्रकल्पात २५ ते ५० टक्क्यांदरम्यान, ९ प्रकल्पात ५० ते ७५ टक्‍केदरम्यान तर ६९ प्रकल्पात ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त साठा आहे.

परभणीतील २२ लघू प्रकल्पांपैकी २ प्रकल्पांत २५ ते ५० टक्क्यांदरम्यान, ३ प्रकल्पांत ५० ते ७५ टक्क्यांदरम्यान तर १७ प्रकल्पांत ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त साठा आहे. हिंगोलीतील २७ लघू प्रकल्पांपैकी एका प्रकल्पात २५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी, ७ प्रकल्पांत ५० ते ७५ टक्‍क्‍यांदरम्यान व १९ प्रकल्पांत ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त साठा शिल्लक आहे.

दोन मध्यम प्रकल्प जोत्याखाली

मराठवाड्यातील ७५ मध्यमपैकी छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील प्रत्येकी एका प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली आहे. याशिवाय १३ मध्यम प्रकल्पांत २५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील सर्वाधिक १० व छाराशिवमधील ३ मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com