Farmer Protest: वीस जिल्ह्यांत लाक्षणिक उपोषणाद्वारे केंद्र सरकारचा निषेध

Central Govt Protest: पंजाबमधील शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी व सरदार डल्लेवाल यांनी उपोषण सोडावे या मागणीसाठी सोमवारी (ता. २०) स्वतंत्र भारत पक्षातर्फे राज्यातील वीस जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
Farmers Demands
Farmers DemandsAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News: पंजाबमधील शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी व सरदार डल्लेवाल यांनी उपोषण सोडावे या मागणीसाठी सोमवारी (ता. २०) स्वतंत्र भारत पक्षातर्फे राज्यातील वीस जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी ही माहिती दिली.

अनिल घनवट यांनी सांगितले, की पंजाब आणि हरियाना राज्यांच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन अकरा महिन्यांपासून सुरू आहे. केंद्रीय कृषिमंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवावा, अशी त्यांची रास्त अपेक्षा आहे. अकरा महिने होऊनही केंद्र सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नसल्यामुळे भारतीय किसन युनियन (अराजनैतिक) या संघटनेचे अध्यक्ष सरदार जगजितसिंग डल्लेवाल यांनी उपोषण सुरू केले. पंचावन्न दिवस उलटून गेले तरी सरकार बोलणी करण्यास तयार नाही. उपोषणामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे.

Farmers Demands
Farmers Demands : रिसोड येथे विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीचा मोर्चा

शेतकरी आंदोलनाकडे सरकारचे दुर्लक्ष निषेधार्ह आहे. शांततेच्या मार्गाने अतिशय अहिंसक पद्धतीने हे आंदोलन सुरू आहे. देशाचे पंतप्रधान किंवा कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासमवेत चर्चा करावी. ज्या शक्य असतील त्या मागण्या मंजूर कराव्यात ज्या शक्य नसतील त्या का मंजूर येत नाहीत ते समजावून सांगावे, असे मत घनवट यांनी अहिल्यानगर येथे झालेल्या आंदोलनात व्यक्त केले.

Farmers Demands
Farmers Protest : केंद्र सरकार पंजाब, हरियाणाच्या शेतकऱ्यांसोबत बैठकीस तयार; १२१ शेतकऱ्यांनी सोडलं उपोषण

पूर्ण भारतातील शेतकऱ्यांनी एकजूट होऊन सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा विरोध करायला हवा. आपापसातील मतभेद बाजूला ठेऊन एक किमान समान कार्यक्रम घेऊन सरकारकडे शेतकरी हिताचे धोरण तयार करण्यास भाग पाडले पाहिजे, अशी अपेक्षा या वेळी आंदोलकांनी व्यक्त केली.

अनिल घनवट यांनी अहिल्यानगर येथील आंदोलनात सहभाग घेतला. विक्रम शेळके, नीलेश शेडगे, वामनराव भदे, ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बान, सुनीता वानखेडे, नवनाथ दिघे, शीतल पोकळे, बाळासाहेब सातव, अंबादास चव्हाण, पांडुरंग पडवळ, महादेव खामकर, बाबासाहेब रिकामे, कारभारी कणसे, डॉ. संजय कुलकर्णी आदी नेते सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यांत त्या-त्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी लाक्षणिक उपोषणाचे आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com