Vegetables Protect From Heat : रखरखत्या उन्हापासून भाजीपाला संरक्षणासाठी शेतकऱ्यांची नामी युक्ती

Water Shortage : पाणीटंचाई आणि वाढत्या उष्म्याच्या संकटात भाजीपाला पिके वाचवण्यासाठी शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.
Vegetables Protect From Heat
Vegetables Protect From Heatagrowon

Kolhapur Heat Temperature : कोल्हापूर जिल्ह्यात तापमान वाढत असल्याने शेती पिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने पीके करपू लागली आहेत. दरम्यान वाढत्या तापमानात पिकांचे आणि भाजीपाल्यांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी पाणी देत असतो. परंतु शिरोळ तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी यावर नामी युक्ती काढत भाजीपाल्यांचे संरक्षण केले आहेत.

कापडांच्या माध्यमातून भाजीपाला पिकांचे उष्म्यापासून संरक्षण केले जात आहे. आधीच पाणीटंचाई आणि वाढत्या उष्म्याच्या संकटात भाजीपाला पिके वाचवण्यासाठी शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. गेल्या महिन्यापासून मोठ्या प्रमाणात कडक उन्हाचा तडाखा पडत असल्याने भाजीपाला धोक्यात आला आहे.

अशातच पंचगंगा, दूधगंगा नद्या कोरड्या पडत असल्याने पाणीटंचाईलाही सामोरे जावे लागत आहे. यावर मात करीत - शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी - मिरचीसह भाजीपाल्याच्या पिकावर कापडाचे संरक्षण दिले आहे.

तालुक्यात कृष्णा, वारणा, पंचगंगा

व दूधगंगा अशा चार नद्यांमुळे समृद्ध असलेल्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात उसासह भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. येथील भाजीपाला बंगळुरू, पुणे, मुंबई, हैद्राबाद, सुरत, अहमदाबाद, भोपाळ, दिल्ली, नागपूर यासह देशातील मोठ्या बाजारपेठेत पाठविला जातो. नांदणी हे भाजीपाल्याचे प्रमुख केंद्र आहे. सध्या मात्र भाजीपाल्याचा दर कमी-जादा प्रमाणात होत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

Vegetables Protect From Heat
Farmers Subsidy : नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा फक्त शब्दच अद्याप अनुदान नाहीच

अशातच गेल्या महिन्यापासून शिरोळ तालुक्यात उन्हाचा मोठा तडाखा बसत असल्याने लाखो रुपयांचा खर्च करूनही पिके वाळण्याचा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यात उदगांव येथील एका शेतकऱ्याने मिरचीचे पीक घेतले आहे. मात्र, उन्हामुळे मिरचीची झाडे वाळत आहेत. शिवाय झाडाला मिरचीची लागण कमी होत असल्याने संपूर्ण एक एकर पिकाला कापडाने संरक्षण दिले आहे. त्यामुळे या उन्हाच्या तडाख्याला मिरची पिकाला संरक्षण मिळाले आहे.

शिरोळ तालुक्यात कोबी, फ्लॉवर, ढबू मिरची, टोमॅटो, दोरडा, कारली, भेंडी, गवारी यासह मोठ्या प्रमाणात भाजीपाला आहे. एकीकडे उन्हाने तर दुसरी वारवांर नदीतील पाणीटंचाई होत असल्याने शेतकरी कोंडीत सापडली आहे. त्यामुळे शेतकरी एक-दोन आडोळी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

पाणीटंचाई आणि वाढत्या उष्णतेतून भाजीपाला पिकांचे संरक्षण करणे कसरतीचे बनले आहे. अवकाळी पाऊस झाल्याशिवाय हवेत गारवा आणि पाणीटंचाईचे सावट दूर होणार नाही. तोपर्यंत भाजीपाल्याची काळजी घेण्यासाठी पिकावर कापडांचे आवरण टाकावे लागत आहे. - विठ्ठल पाटील, शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com