Farmers Subsidy : नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा फक्त शब्दच अद्याप अनुदान नाहीच

Maharashtra Government : राज्य शासनाने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत पन्नास हजार प्रोत्साहनपर अनुदान दिले.
Farmers Subsidy
Farmers Subsidyagrowon

Maharashtra Farmers : राज्य शासनाने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत पन्नास हजार प्रोत्साहनपर अनुदान दिले. जिल्ह्यातील अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विषय मांडल्यानंतर शासनाने परिपत्रक जारी केले होते. यामध्ये एका वर्षात दोनवेळा पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान तीन वर्षांत पहिल्या वर्षी २०१७-१८ मध्ये पीककर्ज उचल केलेल्या हजारो शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. काही शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण केले असून बँकेत पैसे वर्ग केल्याचे मेसेज आले आहेत. मात्र प्रत्यक्ष बँकेत रक्कम आली नसल्याचे चित्र आहे.

नियमित पीककर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ देण्यासाठी २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० हा कालावधी विचारात घेतला. पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त पन्नास हजार, ५० हजार पेक्षा कमी असल्यास सन २०१८-१९ व २०१९-२० वर्षात कर्जाच्या मुद्दलाच्या रकमेत लाभ देण्यात आला.

एकाच आर्थिक वर्षात दोन वेळा पीककर्ज उचल केलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला होता. अशा १३१७० शेतकऱ्यांची पुन्हा यादी केली आहे. यामध्ये तीन वर्षात एक वर्ष वाटप केलेली रक्कम धरलेली नाही. शासनाच्या पोर्टलवर याद्या अपलोड केल्या आहेत. यामध्ये सरकारी नोकर, व इन्कम टॅक्स भरणारे हजार शेतकरी अपात्र होतील.

जिल्ह्यात ६० शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण केले असून बँकेत पैसे वर्ग केल्याचे मेसेज आले आहेत मात्र प्रत्यक्ष बँकेत कोणतीही रक्कम आली नसल्याचे चित्र आहे. अनुदान देण्याचा पूर्वीचा निर्णय असल्यामुळे लोकसभेच्या आचारसंहितेचा प्रश्न उद्भवत नाही. यामुळे हे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

Farmers Subsidy
Farmer Death : दोन महिन्यांत संपवले ४२७ शेतकऱ्यांनी जीवन

दरम्यान, २०१७-१८ हे वर्ष धरले नसल्यामुळे सुमारे एक हजार शेतकऱ्यांवर पुन्हा अन्याय होत आहे. या शेतकऱ्यांनाही अनुदान मिळावे, अशी मागणी होत आहे. कर्जमाफीची ही सातवी यादी असून, पुन्हा तेच तेच काम करावे लागत असल्यामुळे ह सचिवांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

३ जानेवारी २०२४ ला आधार प्रमाणीकरण व पैसे बँक खात्यात वर्ग झाल्याचा मेसेज आला. मात्र बँकेत पैसे आलेले नाहीत. सेवा सोसायटीमध्ये चौकशी केली. असे अनेक शेतकरी आहेत की ज्यांना मेसेज आला पण पैसे नाहीत. आम्ही प्रामाणिकपणे पीककर्ज परतफेड केली असून लाभ मिळावा.

जनार्दन मारुती पाटील, दोनवडे, शेतकरी अनुदान निर्णय पूर्वीच असत्यामुळे अनुदान शेतकऱ्यांना मिळेल. यासाठी पाठपुरावा सुरू असून २०१८-१९, व २०१९-२० या दोन वर्षात पीककर्ज उचल केले यावर अनुदान दिले जाणार आहे. नीलकंठ करे, सहकार उपनिबंधक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com