Farmer Strike : पलूसला कृष्णा कालव्यात शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

Farmer Demand on Water : कृष्णा कालव्यात तत्काळ पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी पलूस तालुक्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. २६) कृष्णा कालव्यातच ठिय्या आंदोलन केले.
Farmer Strike
Farmer StrikeAgrowon

Sangli News : ऐन उन्हाळ्यात कोरड्या असलेल्या व शेतीला वरदान ठरणाऱ्या कृष्णा कालव्यात पाणी सोडण्यासाठी प्रशासन टाळाटाळ करीत आहे. शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. कृष्णा कालव्यात पाणी नसल्याने ऊस, द्राक्षबागा व अन्य पिके कोमेजली आहेत. कृष्णा कालव्यात तत्काळ पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी पलूस तालुक्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. २६) कृष्णा कालव्यातच ठिय्या आंदोलन केले. मोर्चाने जाऊन पलूसच्या तहसीलदारांना निवेदन झाले. शेतकरी आक्रमक झाले होते.

कृष्णा कालव्यात पाणी सोडावे, अशी मागणी शेतकरी दोन-तीन महिन्यांपासून करीत आहेत. वेळोवेळी निवेदने देण्यात आली. विजापूर-गुहागर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन झाले. किर्लोस्करवाडीच्या पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला शेतकऱ्यांनी टाळे ठोकले, तरीही पाटबंधारे विभाग, राज्य शासन कृष्णा कालव्यात पाणी सोडण्यास तयार नाही. संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. सकाळी सर्व शेतकरी येथील हुतात्मा स्मारकासमोर एकत्र आले. त्यानंतर मुख्य बाजारपेठ, कऱ्हाड-तासगाव महामार्गावरून तहसील कार्यालयापर्यंत जाऊन तहसीलदारांना निवेदन दिले.

Farmer Strike
Water Demand : जायकवाडी, माजलगाव धरणांत पाणी उपलब्ध करून द्या

कृष्णा कालव्यात तत्काळ पाणी सोडावे, न्यायालयाने आदेश दिल्याप्रमाणे हक्काचे २.६७ टीएमसी पाणी सोडावे, पोटपाटांना कऱ्हाड ते वसगडेपर्यंत लोखंडी पाईपसह सूस व्हॉल्व्ह बसवावेत, कालव्याच्या बाजूला मुरमीकरण करावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर सर्व शेतकरी पलूस येथील पलूस-आमणापूर रस्त्याच्या दरम्यान असलेल्या कृष्णा कालव्यात आले. चक्क कालव्यात त्यांनी ठिय्या आंदोलन केले. मोर्चा व ठिय्या आंदोलनात मानसिंग बँकेचे संस्थापक जे. के. जाधव, गणपतराव पुदाले, गणपतराव सावंत, पलूस बँकेचे अध्यक्ष वैभव पुदाले, सुहास पुदाले, सुधीर जाधव, व शेतकरी, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Farmer Strike
Demand for Compensation : शेडनेट बीजोत्पादकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी

पाणी सोडल्याच्या अफवा

कृष्णा कालव्यात पाणी सोडल्याच्या अफवा पसरवून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात येत आहे. मात्र, आंदोलनस्थळी येऊन किर्लोस्करवाडी विभागाचे शाखा अभियंता अमोल पाटील यांनी, पाणी सोडण्यात आले नाही. दोन दिवसांत पाणी सोडण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले.

कडक उन्हात महिलांची उपस्थिती

कृष्णा कालव्यात ठिय्या आंदोलन झाले. भर उन्हात शेतकऱ्यांसह महिलाही सहभागी झाल्या. कृष्णा कालव्यात पाणी सोडण्यात यावे, यासाठी शेतकरी आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com