Demand for Compensation : शेडनेट बीजोत्पादकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी

Agricultural Damage : अकोला जिल्ह्यात २६ फेब्रुवारीला पांगरी शिवारात गारपिटीने शेडनेट व शेडनेटमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
Shednet
ShednetAgrowon
Published on
Updated on

Buldhana News : अकोला जिल्ह्यात २६ फेब्रुवारीला पांगरी शिवारात गारपिटीने शेडनेट व शेडनेटमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानामुळे शेडनेट बीजोत्पादक शेतकरी उद्‍ध्वस्त झाला असून या पिकांचा विमा कुठलीही कंपनी घेत नाही.

परिणामी प्रत्येक शेडनेटधारक शेतकऱ्यांचे एक ते दीड लाख रुपये नुकसान होऊनही शासनाच्या मदतीपासून शेतकरी वंचित आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या शेडनेटधारक शेतकऱ्यांना शासनाने तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी पांगरी गावातील २०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी केली आहे.

Shednet
Mahashivratri : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्रीची जय्यत तयारी

तालुक्यातील पांगरी माळी येथील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी बुधवारी (ता.सहा) तहसीलदारांची भेट घेत मागणी केली. तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीबाबत त्यांच्याशी चर्चा केली.

२६ फेब्रुवारीला गारपीट आणि वादळी वाऱ्याने पांगरी शिवारातील शेकडो शेडनेटचे नुकसान झाले आहे. त्यामधील मिरची, सिमला मिरची, टोमॅटो बीजोत्पादन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नैसर्गिक आपत्ती झाल्यास सर्व पिकांचा विमा मिळतो. मात्र शेडनेटचा कोणताही विमा मिळत नाही व कंपनीकडूनही कुठल्याही प्रकारचा विमा व भरपाई नसल्याने शेडनेटधारक धास्तावले आहेत. नुकसान होऊनही शेतकऱ्यांना मदत भरपाई मिळत नाही.

Shednet
Election Boycott : मंगळवेढ्यातील २४ गावांचा निवडणुकांवर बहिष्कार

शासनाने विशेष बाब म्हणून शेडनेट उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे केली आहे. निवेदन देताना अशोक वाघ, भानुदास वाघ, बद्रीनाथ वाघ, कविता वाघ, धुराजी वाघ, लक्ष्मी वाघ, कैलास वाघ, जयराम वाघ, कालिंदा वाघ, अनिल वाघ, कुंडलिक वाघ, ज्योती वाघ, ज्ञानेश्वर वाघ, पूनम वाघ, विठ्ठल वाघ, रामकृष्ण गिराम, शुभम गिराम, कुलदीप वाघ, प्रदीप वाघ, बळीराम गिराम, विठ्ठल गिराम, संजय पगार, ज्ञानेश्वर सोनुणे, अंकुश जाधव, सीताबाई वाघ, आकाश वाघ गणेश वाघ यांच्यासह असंख्य शेडनेटधारक शेतकरी उपस्थित होते.

बीजोत्पादनात पांगरी अग्रेसर

मागील काही वर्षात पांगरी येथील शेतकऱ्यांनी शेडनेटमध्ये बीजोत्पादन घेऊन नाव केले आहे. या गावात सुमारे हजारावर शेडनेट आहेत. शेडनेटमध्ये बीजोत्पादनात सातत्याने परिश्रम घेत येथील शेतकऱ्यांनी आर्थिक समृद्धी मिळवली. शेतकरी स्वावलंबी बनले. रोजगार निर्मिती झाली. २६ फेब्रुवारीला झालेल्या आपत्तीने नुकसान केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com