Ujani Dam : उजनीतून शेतीला पाणी सोडण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांच आवाहन

Minister Chandrakant Patil : ११ जानेवारी ते ११ फेब्रुवारी या कालावधीत उजनीतून कालव्याद्वारे शेतीसाठी एक सिंचन आवर्तन देण्यात यावे अशा सूचना चंद्रकांत पाटील यांनी केल्या.
Ujani Dam
Ujani Damagrowon
Published on
Updated on

Ujani Dam Project : ११ जानेवारी ते ११ फेब्रुवारी या कालावधीत उजनीतून कालव्याद्वारे शेतीसाठी एक सिंचन आवर्तन देण्यात यावे, तसेच पिण्यासाठी पाणी पुरविण्यास प्राधान्य देऊन उपलब्ध पाण्याचे अत्यंत सुक्ष्म नियेाजन करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.

गतवर्षी पाऊस कमी झाला असून, उपलब्ध पाणी येणाऱ्या पावसाळयापर्यत पुरविण्यासाठी सिंचन विभागाने नियोजन करावे असे सांगून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पिण्याचे पाणी पुरविण्यास प्राधान्य देण्यात यावे अशी सूचना केली.

यापूर्वी कालवा सल्लागार समितीने मंजूरी दिल्याप्रमाणे पाण्याच्या आवर्तनाचे नियेाजन संबधितांनी केले नसल्यास त्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडून चौकशी करण्यात येईल असे सांगून, आवश्यकतेनुसार आढावा घेऊन कालवा सल्लागार समितीची पुन्हा बैठक घेण्यात येईल असे सांगितले.

उजनी प्रकल्पात सध्या ५.३४ टीएमसी (९.५८ टक्के) उपयुक्त पाणीसाठी आहे. उजनी भिमा प्रकल्पाद्वारे सन २०२२-२३ मध्ये प्रत्यक्ष भिजलेले क्षेत्र २ लाख ५४ हजार २५३ हेक्टर (८४.५० टकके) होते अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Ujani Dam
Ujani Water Stock : उन्हाळ्या आधीच उजनी कोरडं पडण्याची शक्यता ; धरणात अवघा ९ टक्के पाणीसाठी

अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी उपलब्ध पाणीसाठा,कालव्यावरील आठमाही प्रकल्पीय पीक रचना, निर्मित सिंचन क्षमता व प्रत्यक्ष सिंचित क्षेत्र, मागील पाच वर्षातील पाणीपट्टी वसूली, खरीप व रब्बी हंगाम २०२३-२४ मधील प्रत्यक्ष पाणी वापर, उर्वरित कालावधीसाठी पाण्याचे नियोजनाविषयीची सविस्तर माहिती बैठकीत सादर केली.

यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनीधींनी समान पध्दतीने उपलब्ध पाणी वाटप करण्याची सूचना लोकप्रतिनिधींनी यावेळी केली. माढयाचे आमदार बबनदादा शिंदे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाषबापू देशमुख, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री.कपोले हे दृकश्राव्य माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com