Water Demand : जायकवाडी, माजलगाव धरणांत पाणी उपलब्ध करून द्या

Water Crisis : यंदा पावसाचे कमी प्रमाण, दीर्घ खंड यामुळे गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील सर्व धरणांमध्ये अपुरा पाणीसाठा आहे.
Jayakwadi Dam
Jayakwadi DamAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : समन्यायी पाणी वाटपातील तरतुदीनुसार जायकवाडी धरणांमध्ये २० टिएमसी व माजलगाव धरणांमध्ये ५ टिएमसी एवढा पाणीवाटा वरच्या धरणातून तत्काळ उपलब्ध करुन देण्यात यावा या प्रमुख मागणींसाठी राज्य किसान सभा गुरुवार (ता. १२) पासून आंदोलन करणार आहे, अशी माहिती किसान सभेचे सरचिटणीस कॉम्रेड राजन क्षीरसागर यांनी दिली.

यंदा पावसाचे कमी प्रमाण, दीर्घ खंड यामुळे गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील सर्व धरणांमध्ये अपुरा पाणीसाठा आहे. परभणी जिल्ह्यात जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याचे लाभक्षेत्र पाथरी, मानवत, परभणी, पूर्णा तालुक्यात व माजलगाव कालव्याचे लाभक्षेत्र सोनपेठ, गंगाखेड तालुक्यात आहे.

Jayakwadi Dam
Water Crisis : पावसाळा संपत आला तरी शेटफळगढेमध्ये टँकरने पाणी

या तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला आहे. मेंढेगिरी यांच्या अध्यक्षतेखालील गोदावरी अभ्यास गटाच्या सूत्रानुसार जायकवाडी व माजलगाव प्रकल्पासाठी वरच्या प्रकल्पातून पाणी उपलब्ध करून देण्याची कायदेशीर जबाबदारी शासन आणि गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळ यांची आहे. मात्र याबद्दल अद्याप कोणतेही पावले उचलण्यात आलेली नाहीत.

दुष्काळी परिस्थितीत विशेष पाणी वाटा देण्याची देखील तरतूद आहे. या तरतुदींचा अवलंब करून जायकवाडीव माजलगाव धरणात पाणीवाटा वरच्या धरणातून तत्काळ उपलब्ध करण्यात यावा.

या दोन प्रकल्पातील लाभक्षेत्राच्या संपूर्ण क्षेत्रासाठी रब्बी व उन्हाळी हंगामात १२ पाणीआवर्तने गहू, हरभरा, उन्हाळी भुईमूग आदी पिकांसाठी सोडण्यात यावीत. खरिपातील कापूस व सोयाबीन या पिकांसाठी संरक्षित पाणी आवर्तनांची कायमची तरतूद करावी.

Jayakwadi Dam
Water Crisis : पुणे जिल्ह्यात केवळ पुरंदर तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा

जायकवाडी प्रकल्पाच्या काल दुरुस्तीसाठी प्रलंबित अडीच हजार कोटी रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध करावा. जायकवाडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात पाणी वापर सहकारी संस्था मार्फत लोकसहभागाने सिंचन प्रणाली कायम करावी. रिक्त पदांची भरती करावी.

ढालेगाव, तारुगव्हाण, मुद्गल, मुळी, दिग्रस, अंतेश्वर बंधाऱ्यावरील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी परवाने द्यावेत. या बंधाऱ्यांना जायकवाडीतून आवश्यक तो पाणीसाठा निश्चित करुन उपलब्ध करून देण्याची कायमची तरतूद करावी आदी मागण्यासाठी आंदोलन केले जाणार आहे, असे कॉम्रेड क्षीरसागर यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com