PM Kisan : पीएम किसानची रक्कम वाढणार का? कृषी मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

Agriculture Minister : पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दिले जाणाऱ्या ६००० रुपये वार्षिक अर्थसहाय्याची रक्कम वाढविण्याचा सध्या कोणताही प्रस्ताव नाही.
PM Kisan
PM Kisanagrowon
Published on
Updated on

PM Kisan Scheme : पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दिले जाणाऱ्या ६००० रुपये वार्षिक अर्थसहाय्याची रक्कम वाढविण्याचा सध्या कोणताही प्रस्ताव नाही, असे केंद्र सरकारकडून संसदेत स्पष्ट करण्यात आले. शेतकऱ्यांना पीएम किसानच्या रक्कमेत वाढ करून ८ ते १२ हजार करण्याचा निर्णय घेण्यात असल्याची चर्चा होती. परंतु या चर्चेना आता पूर्णविराम मिळाला आहे.

मात्र, कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी आज संसदेच्या पटलावर या चर्चाना पूर्णविराम दिला. तसेच या योजनेंतर्गत महिला शेतकऱ्यांसाठीही रक्कम वाढवण्याचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे कृषी मंत्री मुंडा यांनी लेखी प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात २०१९ मध्ये अंतरिम अर्थसंकल्पादरम्यान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू झाली होती. या योजनेत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये समान तीन हप्त्यांमध्ये मदत केली जाते.

याअंतर्गत दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जमा केले जातात. यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये ही रक्कम वाढणार असल्याचे बोलले जात होते.

ऑनलाईन प्रक्रिया अशी पूर्ण करा

PM किसान https://pmkisan.gov.in/ च्या अधिकृत वेबपेजला भेट द्या.

पेजच्या उजव्या बाजूला उपलब्ध असलेल्या eKYC पर्यायावर क्लिक करा.

आधार कार्ड क्रमांक, कॅप्चा कोड एंटर करा आणि सर्चवर क्लिक करा.

आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका.

'ओटीपी प्राप्त करा' आणि एंटर करा

फेस ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी करा, कसं ते जाणून घ्या.

तुम्ही फेस ऑथेंटिकेशनद्वारेही ई-केवायसी करू शकता. यासाठी गुगल प्ले स्टोअरमध्ये जा.

पीएम किसान अ‍ॅप डाउनलोड करा.

पीएम किसान अ‍ॅपमध्ये लॉग इन केल्यानंतर, फेस ऑथेंटिकेशनद्वारे पीएम किसान eKYC चे पेज उघडेल.

सर्व माहिती भरा आणि OTP पडताळणी करा.

फेस ऑथेंटिकेशनद्वारे PM किसान eKYC चा डॅशबोर्ड उघडेल.

इतर लाभार्थींसाठी eKYC या पर्यायावर क्लिक करा.

फेस ऑथेंटिकेशनद्वारे PM किसान eKYC चे एक नवीन पेज उघडेल.

येथे विचारलेली सर्व माहिती भरल्यानंतर Proceed या पर्यायावर क्लिक करा.

फेस ऑथेंटिकेशनद्वारे PM किसान eKYC चे पेज पुन्हा उघडेल.

येथे स्कॅन फेस या पर्यायावर क्लिक करून तुमचा चेहरा स्कॅन करा.

चेहरा स्कॅन होताच, तुमचा PM फेस ऑथेंटिकेशन eKYC पूर्ण होईल आणि तुम्हाला त्याचा संदेश मिळेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com