Agriculture Minister Bharane: शेतकऱ्यांना आनंदी करणारे कामकाज करू: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Agriculture Department: कृषिमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारताच दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी (ता.२) कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्यासोबत काही तास चर्चा केली. त्यांनी कृषी विभागाची रचना, योजना समजावून घेतल्या. या विभागाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रासाठी काम करण्यास चांगली संधी आहे,
Agriculture Minister Dattatray Bharane
Agriculture Minister Dattatray BharaneAgrowon
Published on
Updated on

Pune News: कृषिमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारताच दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी (ता.२) कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्यासोबत काही तास चर्चा केली. त्यांनी कृषी विभागाची रचना, योजना समजावून घेतल्या. या विभागाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रासाठी काम करण्यास चांगली संधी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चेत व्यक्त केली. दरम्यान, ‘अॅग्रोवन’शी संवाद साधताना शेतकऱ्यांना आनंदी ठरणारे कामकाज करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.

कृषिमंत्रिपद मिळाले आहे; पहिली प्रतिक्रिया काय आहे?

शेतकऱ्याचा मुलगा म्हणून शेतकऱ्यांसाठी काम करण्याची संधी मिळते आहे. त्यामुळे आनंद होतो आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा, आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आणि महायुतीने ही जबाबदारी माझ्यावर दिली आहे. मी रोज गावाकडे शेतीत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी मला कळतात. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसावा, यासाठी करावे लागणारे सारे प्रयत्न मी करेल. शेतकऱ्यांचे हित कशात आहे, हे पाहूनच मी भविष्यात निर्णय घेईल. या राज्यातील सामान्य शेतकरी केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठी जे काही करता येईल ते केले जातील. आता शेतीला आधुनिक रूप मिळते आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ‘एआय’चा वापर कृषी क्षेत्रात कसा वाढेल, त्यासाठी मी प्राधान्य देणार आहे.

Agriculture Minister Dattatray Bharane
Agriculture Minister Dattatray Bharne: शेतकऱ्याचा मुलगा ते कृषिमंत्री; दत्तात्रय भरणे यांचा प्रवास

कृषी विभागात काही धोरणात्मक बदल करण्याबाबत ठरवले आहे का?

कृषी विभागाची सूत्रे स्वीकारून मला अवघे काही तास झाले आहेत. केंद्र शासनाचा जास्तीत जास्त निधी राज्यात कसा आणता येईल, कोणत्या योजना चांगल्या आहेत व त्या शेतकऱ्यांपर्यंत कशा पोहोचवता येतील, गावागावांत कृषी योजना कशा पोहचतील याविषयी मी अभ्यासाअंती काही मुद्दांचा पाठपुरावा करणार आहे. शेतकरी हिताच्या धोरणावर माझे लक्ष राहील. अर्थात, त्यासाठी मला अजून कामकाज समजावून घ्यावे लागणार आहे.

Agriculture Minister Dattatray Bharane
Manikrao Kokate: शह-काटशहचे बळी कोकाटे

कृषी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता?

राज्यातील बळीराजा आणि आमच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे नाते मैत्रीचे असावे. अधिकारी किंवा कर्मचारी ही सरकारी व्यक्ती नसून तो माझ्या घरातील व्यक्ती आहे, अशी भावना शेतकऱ्याला वाटायला हवी. अधिकाऱ्यांनी देखील शेतकऱ्यांना सेवा देताना आपल्या माध्यमातून शेतात अन्नधान्याचे उत्पादन कसे वाढेल, त्यातून शेतकऱ्याच्या संसारात आनंद कसा फुलवता येईल, असा व्यवहार ठेवायला हवा. शेतकरी व कृषी अधिकारी हे राज्याच्या शेतीचे मुख्य घटक असून त्यांचे नाते मैत्रीचे, घरोब्याचे हवे. त्यासाठी उपयुक्त ठरणारे कामकाज करावे, हेच मी अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो.

कृषिमंत्री बनले विद्यार्थी

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे कृषी आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांसमोर अक्षरशः कागदपेन घेऊन बसले. त्यांनी विद्यार्थ्यांप्रमाणे टिपणे घेतली. विमा योजना कशी चालते, शेतकऱ्यांचा फायदा काय, आयुक्तालयाचे काम कसे चालते, संचालक काय कामे करतात, तालुका कृषी अधिकारी काय करतो, ठिबकसह आत्मा यंत्रणेचे कामकाज त्यांनी समजून घेतले. या टिपणांमुळे मला खात्याचा अभ्यास होण्यास मदत झाली आहे, असे त्यांनी बोलून दाखवले. तसेच, राज्यात २० हजार कर्मचारी व ४-५ सनदी अधिकारी असलेला कृषी विभागाचा विस्तार पाहून ‘महसूल’पेक्षाही ‘कृषी’ विभागाची यंत्रणा मोठी आहे, असा निष्कर्ष कृषिमंत्र्यांनी काढला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com