Krishi Din 2025: कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांचा सत्कार

Jalgaon Agriculture: राज्याच्या हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती अर्थात कृषी दिनानिमित्त जिल्ह्यात जिल्हा परिषद, बाजार समित्या व अन्य क्षेत्र, कार्यालयांत विविध कार्यक्रम, उपक्रम झाले.
Krishi Din 2025
Krishi Din 2025Agrowon
Published on
Updated on

Jalgaon News: राज्याच्या हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती अर्थात कृषी दिनानिमित्त जिल्ह्यात जिल्हा परिषद, बाजार समित्या व अन्य क्षेत्र, कार्यालयांत विविध कार्यक्रम, उपक्रम झाले. त्यात शेतकरी, कष्टकऱ्यांचा मिरवणूक काढून सत्कार करण्यात आल्या. स्व, नाईक यांना आदरांजली वाहण्यात आली.

जळगाव जिल्हा परिषदेत पीक स्पर्धेतील यशस्वी शेतकऱ्यांसह, अन्य शेतकऱ्यांचा सत्कार झाला. या वेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजीव लोखंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाबूलाल पाटील,

Krishi Din 2025
Kisan Din : किसान दिनाच्या घोषणेमुळे चौधरी चरणसिंह यांचा गौरव

जिल्हा परिषदेतील कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के, मोहीम अधिकारी अविनाश खैरनार आदी उपस्थित होते. महिला बचत गटातील सदस्य, कर्मचारी आदींना विशेष आमंत्रण देण्यात आले होते. चोपडा येथे शेतकरी, बाजार समिती, कृषी विभाग, आत्मा, कृषी केंद्रचालक आदी विविध संस्था, संघटनांतर्फे कृषी दिनाचा एकत्रीत, भव्य कार्यक्रम घेण्यात आला.

Krishi Din 2025
वसंतराव नाईक यांच्या योगदानामुळे महाराष्ट्र समृद्ध : येरावार

बाजार समितीतून मिरवणूक काढण्यात आली. वसंतराव नाईक व अन्य मान्यवरांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. या वेळी चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांसह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी आदी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, चोपडा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष घनश्याम पाटील, शेतकरी कृती समितीचे एस. बी. पाटील,

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील व अन्य संचालक, शेतकरी डॉ. रवींद्र निकम, डॉ. सुभाष देसाई, अॅड. हेंमचंद्र दगाजी पाटील, कांतिलाल पाटील, अंबादास पाटील, अजय हिंमत पाटील, नरेंद्र मधुकर पाटील, किरण पाटील, प्रफुल्ल पाटील, तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे, विठ्ठल अॅफ्रो संस्थेचे पदाधिकारी, प्रतिनिधी व तालुक्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

महिला शेतकऱ्यांची मोठी संख्या होती. तसेच केळी, कलिंगड, भाजीपाला व्यापारी, तालुक्यातील सर्व कृषी केंद्रचालक यांचीही विशेष उपस्थिती होती. कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आदी भागात फिरविण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com