Kisan Din : किसान दिनाच्या घोषणेमुळे चौधरी चरणसिंह यांचा गौरव

Chaudhary Charan Singh : भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांच्या स्मरणार्थ २००२ मध्ये किसान दिवस साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.
Kisan Din Announcement
Kisan Din Announcement Agrowon
Published on
Updated on

New Delhi News : भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांच्या स्मरणार्थ २००२ मध्ये किसान दिवस साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.

ज्यांनी शेतकरी ग्रामीण विकासासह देशाच्या विकासासाठी आपले आयुष्य समर्पित केले अशा महान व्यक्तीचा गौरव करण्यात आला आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी (ता. २३) केले.

Kisan Din Announcement
Tur Bajarbhav : तुरीचे भाव आणखी पडतील की सावरतील? ; उत्पादनवाढीची शक्यता असली तरी परिस्थिती पूरक

किसान दिवसानिमित्त दिल्ली येथील किसान घाट येथे चौधरी चरणसिंह यांच्या समाधिस्थळी उपराष्ट्रपती धनखड यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी ते माध्यमांशी बोलत होते. या प्रसंगी चौधरी चरणसिंह यांचे नातू आणि राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख जयंत चौधरी उपस्थित होते.

Kisan Din Announcement
Banana Producers Loss : थंडीमुळे केळी उत्पादक, निर्यातदारांना २०० कोटींचा फटका; निर्यात ३० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चौधरी चरणसिंह यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली अर्पण केली.

‘‘गरीब आणि शेतकरी यांचे खरे हितचिंतक माजी पंतप्रधान भारतरत्न चौधरी चरणसिंह यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. देशाच्या प्रती समर्पण आणि सेवाभाव सदैव प्रेरणा देत राहील,’’ या शब्दांत त्यांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com