Ethanol Benefits: ‘इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना मिळाले एक लाख कोटी’

WISMA: पेट्रोलचलित वाहनात २० टक्के इथेनॉल मिश्रण केल्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. उलट देशातील शेतकऱ्यांना इथेनॉलमुळे १.०४ लाख कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे. यामुळे ग्रामीण उत्पन्नाचे स्रोत बळकट झाले आहेत, असा दावा वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (विस्मा) केला आहे.
WISMA
WISMAAgrowon
Published on
Updated on

Pune News: पेट्रोलचलित वाहनात २० टक्के इथेनॉल मिश्रण केल्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. उलट देशातील शेतकऱ्यांना इथेनॉलमुळे १.०४ लाख कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे. यामुळे ग्रामीण उत्पन्नाचे स्रोत बळकट झाले आहेत, असा दावा वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (विस्मा) केला आहे.

इथेनॉल मिश्रणामुळे प्रतिकूल परिणाम होत असल्याचे माध्यमांमधून चर्चिले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे व कार्यकारी संचालक अजित चौगुले यांनी ही भीती निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे. इथेनॉल दुष्परिणामाचे मुद्दे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने देखील फेटाळले आहेत.

WISMA
Ethanol Policy : सर्वहितकारक धोरण

जुन्या वाहनांमध्येही इथेनॉल वापरल्याने इंजिन, इंधन कार्यक्षमता किंवा टिकाऊपणावर प्रतिकूल परिणाम होत नाही. विविध शास्त्रीय चाचण्यांमधून तसे सिद्ध झालेले आहे. इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांना सक्षम बनवणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि देशाची ऊर्जा सुरक्षा वाढवणे शक्य झाले आहे. कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन केवळ इथेनॉल मिश्रणामुळे ७०० लाख टनाने घटले आहे.

WISMA
Ethanol Import: इथेनॉल आयातीवरून साखर उद्योग अस्वस्थ

कच्च्या तेलाच्या आयातीवरील देशाचे अवलंबित्व कमी झाले. तसेच, २०१४ पासून परकीय चलनात १.२ लाख कोटींची बचत झाली आहे, असे ‘विस्मा’ने म्हटले आहे. साखर उद्योगाला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवण्यात इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाची भूमिका सुरुवातीपासून मोलाची ठरली आहे. यामुळे शेतकऱ्यांना उसाचे पैसे वेळेवर मिळण्याची खात्री झाली. त्यातून सरकारी आर्थिक मदतीवरील अवलंबित्व कमी झाले, असे ‘विस्मा’ने म्हटले आहे.

‘इथेनॉल वाढीकरिता कारखाने कटिबद्ध’

इथेनॉल आता देशाच्या जैवइंधन धोरणाचा आणि ग्रामीण परिवर्तनाचा एक आधारस्तंभ बनले आहे. साखर उद्योग आता राष्ट्रीय इथेनॉल धोरणाशी पूर्णपणे सुसंगत अशी कामगिरी बजावतो आहे. त्यामुळे या धोरणाला बळकटी देण्यासाठी व इथेनॉल उत्पादन वाढविण्याकरिता साखर कारखाने कटिबद्ध आहेत, असेही ‘विस्मा’चे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com