Pratiksha Botre
Pratiksha BotreAgrowon

Success Story: शेतकऱ्याची कन्या झाली न्यायाधीश, २५ व्या वर्षी मिळवले घवघवीत यश!

MPSC Exam Success: हवेली तालुक्यातील तुळापूर येथील शेतकरी कन्या प्रतीक्षा पांडुरंग बोत्रेने २५ व्या वर्षी दिवाणी न्यायाधीश बनून आपल्या कुटुंबाचे नाव उज्जवल केले. जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर ती या स्पर्धेत यशस्वी झाली आहे.
Published on

Pune News: राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या दिवाणी न्यायाधीश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये ग्रामीण भागातील हवेली तालुक्यातील तुळापूर येथील एका शेतकरी कन्येने जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी घवघवीत यश संपादन केले आहे. प्रतीक्षा पांडुरंग बोत्रे असे तिचे नाव आहे.

प्रतीक्षाने तुळापूर येथे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. अकरावी व बारावीचे शिक्षण वाघोलीतील भारतीय जैन संघटनेच्या महाविद्यालयात घेतले. त्यानंतर पुणे येथून कायद्याची बीए एलएलबी ही पदवी घेतली.

Pratiksha Botre
Agriculture Success Story: शेतीला मिळाली मसाला उद्योगाची जोड

२०२२ मध्ये न्यायाधीश पदासाठी आलेल्या एमपीएससीच्या जाहिरातीवरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. विशेषतः पहिल्याच प्रयत्नात न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायाधीश परीक्षा उत्तीर्ण केली.प्रतीक्षाला २५० गुणांच्या परीक्षेत एकूण १५० गुण मिळाले, तर मुलाखतीमध्ये ३४ गुण मिळाले आहेत.

राज्यभरातून जवळपास १५ हजार विद्यार्थी या परीक्षेसाठी बसलेले होते. मात्र अंतिम यादीत फक्त ११४ विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. प्रतीक्षाचे आई- वडील शेती व जोडव्यवसाय करतात. या यशानंतर परिवारासह प्रतीक्षाला आनंदाश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.

Pratiksha Botre
MPSC Success Story : देवडीचे अश्पाक झाले न्यायाधीश

‘‘आई -वडिलांनी दिलेल्या प्रेरणेमुळेच मला हे यश प्राप्त झाले. ग्रामीण भागात शक्य तेवढ्या सुविधा नसतात. ज्यांची परिस्थिती चांगली असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना शक्य असेल तर त्यांनी बाहेर पडल्याशिवाय पर्याय नाही. पुण्यात चांगले क्लासेस आहे. तेथे जाऊन चांगला अभ्यास, कष्ट केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही.

त्यासाठी कुटुंबातून मोकळीक दिली पाहिजे. आज सर्व क्षेत्रात स्पर्धा खूप आहे. परंतु स्मार्ट वर्क केल्यास वेळेत यश नक्कीच मिळते,’’ अशी प्रतिक्रिया प्रतीक्षाने ‘अॅग्रोवन’शी बोलताना व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com