Climate Change : हवामान बदलाच्या चटक्यात शेतकरी होरपळतोय!

हवामान बदलामुळे कृषी (शेती) क्षेत्रात अनेक आव्हाने तयार होऊ लागले आहेत. बहुतांश शेतकरी पारंपरिक आणि आधुनिक अशा मिश्र पद्धतीने शेती करताना दिसून येतात.
Climate Change
Climate ChangeAgrowon

सोमिनाथ घोळवे

Weather Update : हवामान बदलामुळे कृषी (शेती) क्षेत्रात अनेक आव्हाने तयार होऊ लागले आहेत. बहुतांश शेतकरी पारंपरिक आणि आधुनिक अशा मिश्र पद्धतीने शेती करताना दिसून येतात. मात्र बदलत्या हवामानानुसार शेतीत नेमका कोणत्या स्वरूपात बदल घडवून आणायला हवा या संभ्रमात आहेत.

शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन, जागृती आणि आर्थिक पतपुरवठा होत नाही. प्रशासन, कृषी तज्ज्ञ, विद्यापीठातील तज्ज्ञांचे, विविध कृषी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांना बदलत्या हवामनुसार शेतीत काय बदल करायला हवेत याविषयी हवे तसे मार्गदर्शन मिळत नाही हे वास्तव आहे.

1.बदलत्या हवामानानुसार शेती करावी. 2.हवामानाला अनुकूलच शेती करावी.

3.हवामान बदलानुसार शेती कसण्याचे तंत्रज्ञान बदलावे.

4.हवामान बदलानुसार शेतकऱ्यांनी देखील कृषी क्षेत्रात बदल घडवून आणावेत.

अशा आशयाच्या अनेक सूचना सातत्याने अनेकांकडून शेतकऱ्यांना करण्यात येतात.

(टीप: शेतीची सर्वात खोलवरची जाण शेतकऱ्यांऐवढी कोणालाही नाही. शेतकरी स्वतः मोठे तज्ज्ञ आहेत.)

Climate Change
Climate Change Impact In Agriculture : शेतीचा करा नव्याने विचार

बदलत्या हवामानानुसार शेतीमध्ये बदल करायचे म्हटले तर तात्काळ बदल करणे शक्य असते का? हा मुख्य प्रश्न आहे. शेतीला खोलवर रुजलेले संस्कृतीचे स्वरूप आहे. ते अतिशय प्रगल्भ आहे. या संस्कृतीत शेतकऱ्यांचे शेतकरीपण खोलवर मुरलेले आहे. त्यामुळे हवामान बदलानुसार शेतीमध्ये बदल करताना कृषी संस्कृतीच्या चौकटीतच बदल करावे लागतील. चौकट बदलून चालणार नाही.

पण नेमके कोणते आणि कसे बदल करावेत याविषयी काल्पनिक आणि अवास्तव सूचना अनेकांकडून देण्यात येत आहेत.

जरी शेतकऱ्यांनी हवामान बदलावर आधारित शेतीमध्ये बदल करायचे ठरवले. तर त्यासाठी लागणारे भांडवल आणि योग्य मार्गदर्शन कोठून आणणार? आर्थिक भांडवल असल्याशिवाय हवामान बदलावर आधरित शेती करणे शक्य आहे का? गेल्या काही वर्षातील शेतीमालाची आणि वाढत्या महागाईची वाटचाल पाहता, शेतकऱ्यांकडे हे आर्थिक भांडवल सद्यस्थितीत तरी नाही. आर्थिक बाबतीत शेतकऱ्यांची मोठी घसरण झाली आहे.

काही मोजक्याच शेतकऱ्यांना पीककर्ज अत्यल्प बँकांकडून दिले जाते, तेही वेळेवर मिळत नाही की शेतीच्या उपयोगाला पडत अशावेळी दिले जाते. त्यामुळे बँकेचे कर्ज घेतले असताना देखील पतसंस्था, खाजगी सावकार आणि मायक्रो फायनान्स कंपन्याचे कर्ज घ्यावे लागते.

जे कर्ज घेऊन जरी शेतीत गुंतवणूक केली, तरी ज्यावेळी प्रत्यक्ष शेतमालातून परतावा मिळतो. तो नफ्याचा असतो का? बहुतांश वेळा नकारात्मक राहिलेला दिसून येतो. त्यातून जरी एखादं दुसऱ्या वेळी नफ्याचा परतावा आला तर बहुतांश शेतकऱ्यांचा त्यातून खाजगी सावकार आणि कंपन्या यांच्या कर्जपरतफेड करावी लागते.

Climate Change
Climate Change : हवामान बदलतेय संशोधनाची दिशा बदला

वर्षानुवर्षे शेतकऱ्यांची झोळी प्रत्येक वर्षी रिकामीच राहते. प्रत्येक वर्षी जर शिल्लक राहणारे पैसे शेतकऱ्यांकडे येत नसतील तर बदलत्या हवामानानुसार शेतीत कसा बदल करणे शक्य होईल का?

बागायती शेतीमध्ये पाणी असल्याने नगदी पिके घेण्याचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. त्यामुळे काही प्रमाणात हवामान बदलानुसार शेती कसण्याच्या आणि उत्पादन मिळावयाच्या पद्धतीत बदल करतीलही. पण एकूण लागवडीखाली असलेल्या शेतीपैकी जवळजवळ ८४ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. त्यात 80 ते 85 टक्के शेतकरी हे अल्पभूधारक आहेत.

अल्पभूधारक आणि कोरडवाहू परिसरातील शेतकऱ्यांनी काय बदल करायचे या संदर्भात काही व्हिजन आहे का? याचे उत्तर कोणाकडे आहे का? असे हळूहळू अनेक आव्हाने शेतीक्षेत्रात निर्माण होऊ लागले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com