PigeonPea New Variety: दुर्गम जिल्ह्यातील शेतकऱ्याने विकसित केले तूर वाण

Vandana Tur: दुर्गम चंद्रपूर जिल्ह्यात प्रयोगशीलता जपत शिवारात नवनवे प्रयोग करणाऱ्या मधुकर भलमे यांनी निवड पद्धतीने ‘वंदना’ हे मध्यम कालावधीचे तूर वाण विकसित केले आहे.
PigeonPea New Variety
PigeonPea New VarietyAgrowon
Published on
Updated on

Chandrapur News: दुर्गम चंद्रपूर जिल्ह्यात प्रयोगशीलता जपत शिवारात नवनवे प्रयोग करणाऱ्या मधुकर भलमे यांनी निवड पद्धतीने ‘वंदना’ हे मध्यम कालावधीचे तूर वाण विकसित केले आहे. पाच ते सहा दाणे असलेल्या या वाणाच्या शेंगेच्या अनेक चाचण्या संशोधक संस्थांच्या पातळीवर घेण्यात आल्या. त्यानंतर वनस्पती जातींचे संरक्षण आणि शेतकरी हक्‍क प्राधिकरण (दिल्ली) अंतर्गत या वाणाची नोंदणी करण्यात आली आहे. 

वरोरा तालुक्‍यातील काही भागात धान (भात) लागवड होते. त्यासोबतच कपाशी, सोयाबीन यांसारखी पिकेही घेतली जातात. चारगाव येथील मधुकर भलमे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सलग तूर लागवडीत सातत्य राखले आहे. सुमारे ४० एकरांवर त्यांची तूर लागवड राहते.

PigeonPea New Variety
New Variety Vegetable: जॉइंट अॅग्रेस्कोमध्ये दोन विद्यापीठांच्या वाणांना प्रसारणासाठी मंजूरी

निरीक्षण वृत्ती जपणाऱ्या श्री. भलमे यांनी तूर पिकात वेगळेपण जपणाऱ्या वाणाचे बियाणे वेगळे काढण्यास सुरुवात केली. त्यांच्या या शोधकवृत्तीतूनच ‘वंदना’ हे निवड पद्धतीचे नवे वाण मिळाले आहे. याबाबत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुरीचे कमी कालावधीचे वाण ११० दिवसांत, लांब कालावधीचे वाण हे २२० दिवसांत परिपक्‍व होतात. वंदना हे वाण मध्यम कालावधीचे असून १८० दिवसांत ते परिपक्‍व होते. नोव्हेंबरमध्ये फुलोऱ्यावर, डिसेंबरमध्ये शेंगधारणा, तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हे वाण काढणीस येते.

तुरीची मुळे ही दीड ते दोन फूट खोलवर रुजतात. त्यामुळेच हेच सोटमुळ जमिनीतून पाणी घेण्यास सक्षम ठरतात. पावसाने खंड दिल्याच्या काळात एखाद्या पाण्याची सोय केल्यास उत्पादकतेत वाढ होते. मात्र या तुरीच्या पिकाला अतिरिक्‍त पाणी झाल्यास उत्पादकतेवर परिणाम होतो. त्यामुळे नियंत्रित पाणी द्यावे. तुषारच्या माध्यमातून दोन, तर ठिबक असल्यास अर्धा तास पाणी फायदेशीर ठरते. मात्र पाटपाणी दिल्यास फुलगळही होते, असेही त्यांनी सांगितले.

PigeonPea New Variety
New Crop Variety: जॉइंट अॅग्रेस्कोमधून शेतकऱ्यांना मिळाले १४ वाण

चाचणी

चार ते पाच दाण्याची शेंग त्यासोबतच इतर काही वैशिष्ट्ये जपणाऱ्या या वाणाची नोंदणी व्हावी याकरिता श्री. भलमे यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार केला. तसेच वनस्पती जातींचे संरक्षण आणि शेतकरी हक्‍क प्राधिकरणाला सूचना केली. भारतीय कृषी संशोधन परिषदे अंतर्गत संस्था व 

अकोला कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून या वाणाच्या वैशिष्ट्याचे निरीक्षण नोंदवीत तसा अहवाल प्राधिकरणाला पाठविण्यात आला. चाचणीअंती ‘वंदना’ नावाने या तूर वाणाची नोंद मधुकर भलमे यांच्या नावावर करण्यात आली.

...अशी आहे वैशिष्ट्ये 

  पाच, सहा दाण्यांची शेंग 

  मर रोगाला प्रतिकारक 

  १८० दिवसांत परिपक्‍व होणारे वाण 

  कोरडवाहू एकरी ८ ते १२ क्‍विंटल 

  सिंचन क्षेत्रात एकरी १६ ते १८ क्‍विंटल

आठ वर्षांपासून नोंदणीसाठी पाठपुरावा सुरू होता. गुजरात येथील नॅशनल इनोव्हेटिव्ह फाउंडेशन या संस्थेला प्रत्येकी एक किलो बियाणे पाठविण्यात आले. त्या भागात चाचण्या घेण्यात आल्या. सोटमुळ लांबी, साइड मूळ, फुलोरा, शेंगधारणा यांसह इतर अनेक बारकाव्यांची नोंद घेतली गेली. कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी माझ्या शेतावर निरीक्षण केले. त्यानंतर वेदना तुरीची नोंदणी झाली आहे. 
- मधुकर भलमे, शेतकरी, चारगाव, वरोरा, चंद्रपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com