new crop varieties: ‘जॉइंट अॅग्रेस्को’ मध्ये शेती पिकांच्या १५ वाणांचे सादरीकरण करण्यात आले. त्यावर सखोल चर्चा झाल्यानंतर त्यापैकी १४ नवीन वाण लागवडीसाठी प्रसारित करण्याची शिफारस करण्यात आली. राष्ट्रीय स्तरावर प्रसारित झालेल्या ५ वाणांची नोंद घेण्यात आली. सोयाबीनच्या फुले प्रशांत (केडीएस ११८८) हा वाण चारकोल रॉट, तांबेरा रोगास बळी पडणारा असल्याने समितीने या वाणास मान्यता नाकारली. या वाणाची कमी ‘ट्रीपसीन इनहीबीटर’ या अपोषक घटकासाठी स्रोत म्हणून नोंदणीची सूचना केली.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
रब्बी ज्वारी – परभणी सुपर दगडी (SPV 2735): राज्यातील विद्यमान वाणांपेक्षा धान्य व कडबा उत्पादनात सरस. रब्बी हंगामासाठी शिफारस.
चवळी – परभणी पद्मा (CPB 2201): लवकर परिपक्व, जास्त उत्पादनक्षम, पिवळा केवडा रोगास प्रतिकारक.
तीळ – TLT-7: पांढऱ्या टपोऱ्या बियांचा, तेल उत्पादन जास्त. फायलोडी व बोंड पोखरणाऱ्या अळीला सहनशील.
तीळ – TLT-19: तेलंगणासाठी खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रसारित.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
रब्बी ज्वारी – पीडीकेव्ही शाश्वत (AKSV 461R): सरळ वाण, अधिक उत्पादनक्षम.
नाचणी – पीडीकेव्ही आदिश्री (BFM-8E): लवकर परिपक्व, कीड-रोग प्रतिकारक.
उन्हाळी मूग – पीडीकेव्ही फाल्गुनी (TAKSM 140): एकाचवेळी परिपक्व होणारा, टपोरा.
मूग – पीडीकेव्ही वर्षा (TAKM 141): पिवळा विषाणूजन्य रोगास प्रतिकारक.
हरभरा – पीडीकेव्ही काबुली ५ (AKGK 1802): यांत्रिक काढणीयोग्य, टपोरे दाणे.
जवस – पीडीकेव्ही शारदा (PDKV NL 371): अधिक तेल व उत्पादन, मर व गादमाशीला प्रतिकारक.
गहू – AKW 5100: राष्ट्रीय स्तरावर बागायती क्षेत्रासाठी प्रसारित.
मका – पीडीकेव्ही आरंभ (BMH-18-2): रब्बी हंगामासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रसारित.
ज्वारी – CSV 65 येलो: महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, गुजरातसाठी राष्ट्रीय प्रसारण.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
भात – फुले मावळ ८ (VDN 2003): लांबट बारीक दाणा, अधिक उत्पादन.
बाजरी – फुले मुक्ताई (DHBH 21075): संकरित वाण, करपा व गोसावी रोग प्रतिकारक.
कारळ – फुले कळसूबाई (IGPN 1834): भुरी मूळ व खोड कुजव्या रोगास प्रतिकारक.
गहू – फुले शाश्वत (NIAW 4114): उशिरा पेरणीयोग्य, बागायती क्षेत्रासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रसारित.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
भात – ट्रॉम्बे कोकण महान (TKR 35): मध्यम उंचीचा, लांबट बारीक दाणा, पाणथळ जमिनीत उपयोगी.
कारळ – कोकण कारळा (RTNN2): कोकणसाठी खरीप हंगामात शिफारस.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.