Farmer ID : ‘अॅग्रीस्टॅक’ अंतर्गत साडेतीन लाख शेतकरी खातेदारांची नोंदणी बाकी

Agristack Yojana : विविध कृषी विषयक योजनेअंतर्गत शेतकरी व त्यांच्या शेतजमिनींची माहिती एकत्र करून फार्मर आयडी (शेतकरी ओळख क्रमांक) देण्यात येत आहे.
Farmer ID
Agristack YojanaAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : केंद्र शासनाच्या अॅग्रीस्टॅक या डिजिटल उपक्रमांतर्गत परभणी जिल्ह्यात शुक्रवार (ता.३०)पर्यंत ४ लाख ४७ हजार ६०३ पैकी २ लाख ८३ हजार ९९२ (६३.४५ टक्के) आणि हिंगोली जिल्ह्यात बुधवार (ता.४) अखरे ३ लाख ६३ हजार ९९० पैकी १ लाख ९३ हजार ७७५ (५३.२४ टक्के) शेतकरी खातेदारांनी नोंदणी केली आहे.

या अंतर्गत दोन जिल्ह्यांत मिळून एकूण ४ लाख ७७ हजार ७६७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. परभणी जिल्ह्यातील १ लाख ६३ हजार ६११ आणि हिंगोली जिल्ह्यातील १ लाख ९३ हजार ७७५ शेतकरी मिळून एकूण ३ लाख ५७ हजार ३८६ शेतकरी खातेदारांची नोंदणी बाकी होती अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

Farmer ID
Farmer ID : रत्नागिरीत केवळ ३६ टक्के शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी

शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळवून देण्यासाठी अॅग्रीस्टॅक हा डिजीटल उपक्रम राबविण्यात येत आहे.विविध कृषी विषयक योजनेअंतर्गत शेतकरी व त्यांच्या शेतजमिनींची माहिती एकत्र करून फार्मर आयडी (शेतकरी ओळख क्रमांक) देण्यात येत आहे.शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याासाठी १५ एप्रिलपासून फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आलेला आहे. फार्मर आयडीमुळे पीएम किसान योजनेचा लाभ सुलभ होतो.

Farmer ID
Farmer ID : ‘फार्मर आयडी’शिवाय मिळणार नाही योजनांचा लाभ

पीककर्ज वितरणात सुलभता, पीक विमा योजनेचा लाभ मिळतो. शेतीमालाची हमीभावाने खरेदीसाठी मदत होते.किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज सुलभतेने मिळते. महाडीबीटी अंतर्गत कृषी योजनांचा लाभ मिळतो. नैसर्गिक आपत्तीत पीक नुकसानीचे अनुदान मिळते. राज्य व केंद्र शासनाच्या सर्व कृषी योजनांसाठी आवश्यक आहे.

ग्रामपंचायत स्तरावरील सीएससी सेंटर,आपले सरकार सेवा केंद्र, सेतू कार्यालय येथे शेतकरी ओळखपत्राची नोंदणी करता येते. शेतकरी ओळखपत्राच्या नोंदणीसाठी शेतकऱ्याचा आधार कार्ड आणि ७/१२ उतारा ही आवश्यक कागदपत्रे आहेत.

फार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांना विविध योजनांसह नैसर्गिक आपत्ती पीकनुकसान अनुदान, पीकविमा मिळू शकणार नाही, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी तत्काळ नोंदणी करून घ्यावी महसूल विभागातर्फे करण्यात आले आहे.

Image

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com