Farmer ID : ‘फार्मर आयडी’शिवाय मिळणार नाही योजनांचा लाभ

Agriculture Scheme Benefits : केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषिविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी करीत फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आली आहे.
Farmer ID
Farmer ID Agrowon
Published on
Updated on

Amaravati News : केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषिविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी करीत फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे भातकुली तालुक्‍यातील सर्व शेतकऱ्यांनी शनिवार (ता. ३१)पर्यंत यामध्ये नोंदणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी उत्कर्षा भोसले यांनी केले आहे.

ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी केल्यास शेतकऱ्यांना डिजिटल ओळख मिळणार आहे. या डिजिटल ओळखपत्राचा उपयोग शेतकऱ्यांना विविध व्यासपीठांवर करता येईल. याद्वारे शेतकऱ्यांकडील जमीनधारणा, ते घेत असलेले पीक, कोणत्या क्षेत्रात सिंचन व्यवस्था आहे,

Farmer ID
Farmer ID : बुलडाण्यात २ लाख शेतकऱ्यांकडे ‘फार्मर आयडी’ नाही

कोणत्या योजनांचा लाभ घेत आहेत किंवा घेतला आहे याची अचूक माहिती शासनाला मिळणार आहे. याच फार्मर आयडीच्या आधारे शेतकऱ्यांना वेळीच अनुदान व मदत देणे देखील शक्‍य होईल. खरीप हंगामातील कृषी योजना, पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता, बियाणे व खते अनुदान, महाडीबीटी पोर्टलवरील सर्व अर्ज याकरिता देखील याची गरज भासणार आहे.

Farmer ID
Farmer ID : रत्नागिरीत केवळ ३६ टक्के शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी

आधार कार्ड, आधार लिंक असलेला मोबाइल, सातबारा उतारा याचा उपयोग करीत भातकुली तालुक्‍यातील कोणत्याही सीएससी केंद्रावर नोंदणी करून फार्मर आयडी काढता येणार आहे.

शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून आपल्या हक्‍काच्या योजनांचा लाभ घ्यावा. ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी करताना काही अडचण आल्यास अशावेळी कृषी विभागाशी संपर्क साधत संबंधित समस्येचे निराकरण करता येणार आहे.
- उत्कर्षा भोसले, तालुका कृषी अधिकारी, भातकुली, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com