
Ratnagiri News : जिल्ह्यातील ४ लाख ८७ हजार ९३६ शेतकऱ्यांपैकी १ लाख ७९ हजार ५८१ शेतकऱ्यांनी आपले शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी) तयार केले आहे. जिल्ह्यात ३६ टक्के शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखपत्र आहेत.
ओळखपत्रासाठी शेतकरी अद्याप उदासीन आहेत. खेड तालुक्यात सर्वाधिक ६० टक्के शेतकऱ्यांनी तर रत्नागिरी तालुक्यात सर्वांत कमी फक्त २० टक्के शेतकऱ्यांनीच ओळखपत्र घेतले आहे. कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आता प्रत्येक शेतकऱ्याने आपले ओळखपत्र तयार करणे आवश्यक आहे.
हे ओळखपत्र असल्यास शेतकऱ्यांना पंतप्रधान कृषी योजना, एकात्मिक फलोत्पादन, फळबाग लागवड योजना, खरीप पीकविमा, फळपीक विमा इत्यादी शासकीय योजना, तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेली नुकसानभरपाई मिळण्यास मदत होणार आहे.
त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र तयार करावे, असे आवाहन जिल्हा कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. हे ओळखपत्र जवळच्या आधारसेवा केंद्रात तयार करून दिले जाते. २४ एप्रिलपासून शेतकरी मोबाइलवरूनही ओळखपत्र तयार करू शकतात. २०२१-२२ मध्ये महसूलकडून शेतकऱ्यांची गणना करण्यात आली होती.
तालुकानिहाय शेतकरी, त्यांनी काढलेली ओळखपत्रे
तालुका एकूण शेतकरी ओळखपत्र काढलेले
लांजा ३४,३४७ १८,३४४
राजापूर ६३,७४९ १७,३८९
रत्नागिरी ८८,७७० १८,०५५
संगमेश्वर ५४,३०५ २३,००१
गुहागर ४७,४६२ २३,४६१
चिपळूण ७७,९०३ २८,४३२
खेड ३४,४४९ २०,६९१
मंडणगड २४,२०१ १०,५२६
दापोली ६०,७५० १९,१७२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.