Farm Pond: आळंदी म्हातोबा ग्रामस्थांचे लोकवर्गणीतून शेततळे

Pune Village Initiative: पुणे जिल्ह्यातील आळंदी म्हातोबा गावातील ग्रामस्थांनी लोकवर्गणी गोळा करून दीड एकराचे आणि दोन कोटी लिटर पाणी साठवणारे शेततळे उभारले.
Farm Pond
Farm PondAgrowon
Published on
Updated on

Pune News: आळंदी म्हातोबा (ता. हवेली) येथील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन गावपातळीवर मदत स्वरूपात लोकवर्गणी जमा करून सुमारे दीड एकराचे शेततळे उभे केले आहे. या शेततळ्याची पाणी साठवण्याची क्षमता दोन कोटी लिटर असून पाइपलाइनसह अंदाजे तीस ते पस्तीस लाखांपर्यंत खर्च जाण्याची शक्यता आहे. या शेततळ्यातील पाण्याच्या साठ्यावर उर्वरित जमिनीचा देखील पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे.

या शेततळ्यात नवीन कालव्यातून पाणी सोडण्यात आलेले आहे. त्याचे जलपूजन नुकतेच डॉ. अभिजित दरक, डॉ. राहुल काळभोर, हभप चेतन महाराज माथेफोड, राष्ट्रवादी हवेली अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, केशव तिखे, सचिन माथेफोड, राजेंद्र काळभोर, नितीन करडे, सुनील तुपे, सुनील भोसले, प्रवीण राजगुरू आळंदी म्हातोबा ग्रामपंचायत प्रशासन, वि. वि.सोसायटी सदस्य व ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले.

Farm Pond
Farm Pond: शेततळे - पावसाचे पाणी वाचवा, शेती जगवा!

ग्रामदैवत श्री म्हातोबा जोगेश्वरी या देवस्थानाच्या नावावर असणाऱ्या जमिनीची देखभाल करण्यासाठी खूप वर्षांपूर्वी गावामार्फत समिती नेमण्यात आली होती; परंतु दरम्यानच्या काळात सर्व विश्वस्त मयत झाल्याने जमिनीची देखभाल कोण करणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यावेळी ग्रामसभा घेऊन गावच्या माध्यमातून ग्रामस्थांमधून दत्तात्रय जवळकर यांच्या अध्यक्षतेखाली एक कृती समिती न्यायालयीन कामकाजासाठी व मालमत्ता देखभालीसाठी नेमण्यात आली.

Farm Pond
Farm Pond Scheme : आडुळ मंडळातील ३६ गावात ६२८ च्यावर शेततळे

त्यानुसार या देवस्थानच्या एकूण जागेपैकी बावीस एकर शेतजमीन ओलिताखाली आणून त्या जागेचे उत्पन्न गावाला लावून द्यायचा निर्णय समस्त ग्रामस्थांनी ग्रामसभेत घेतला होता. या पार्श्वभूमीवर लोकवर्गणीमधून सदरील शेततळे बांधण्यात आलेले आहे.

देवस्थानच्या जागेचा विकास करणे तसेच पुढील काळात उर्वरित जमीन ताब्यात घेणे ही या कृती समितीचे उद्दिष्ट आहे. आमच्याकडे सदरील देवस्थानच्या मालमत्तेबाबतचे विस्तृत विवरण कागदपत्र बाराव्या शतकापासूनचे आहे. बाराव्या शतकानंतर पहिल्यांदाच या क्षेत्राचा विकास करण्यासाठी समस्त आळंदी म्हातोबा ग्रामस्थ आनंदाने एकत्र आले आहेत. यासाठी माझे सहकारी भगवान जवळकर, वाल्मीक जवळकर, सुभाष जवळकर, सचिन माथेफोड, कैलास शिवरकर, मोहन जवळकर, माऊली जवळकर, जालिंदर जवळकर तसेच कृती समिती मधील इतर सदस्य व सर्वच ग्रामस्थ दिवसरात्र मेहनत घेत आहेत.
दत्तात्रय जवळकर, अध्यक्ष, कृती समिती , आळंदी म्हातोबा (ता. हवेली)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com