Sainath Jadhav
शेततळे म्हणजे शेतात खणलेला एक मोठा खड्डा, जिथे पावसाचे पाणी जमा होतं. हे पाणी शेती, जनावरं आणि मासे पाळण्यासाठी वापरता येतं.
पावसाचं पाणी वाया जाण्याऐवजी शेततळ्यात साठतं. दुष्काळातही तुमच्या शेताला पाणी मिळतं.
शेततळ्याचं पाणी वापरून तुम्ही वर्षभर शेती करू शकता. यामुळे पीक 20-30% जास्त मिळतं आणि पैसा वाढतो.
शेततळ्यातलं पाणी जमिनीत मुरतं आणि विहिरी, बोअरिंग पुन्हा भरतात. यामुळे शेतीला जास्त पाणी मिळतं.
शेततळ्यात मासे पाळता येतात. यामुळे शेतीसोबतच माशांचा व्यवसाय करून जास्त पैसे मिळतात.
‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतून सरकार 75% खर्च देते. MGNREGA मधूनही मदत मिळते.
शेततळे तुमच्या शेतीला नवं जीवन देईल. पाणी वाचवा, जास्त पीक घ्या आणि कमाई वाढवा.
Egg Eating : दिवसातून किती अंडी खावीत, अंडी खाण्याचे फायदे माहिती आहेत का?