Farm Pond Scheme : आडुळ मंडळातील ३६ गावात ६२८ च्यावर शेततळे

Agriculture Irrigation : शासनाच्या शेततळी योजनेतून आडुळ मंडळातील ३६ गावात ६२८ च्यावर शेततळे करण्यात आले आहेत.
Farm Pond Scheme
Farm Pond Agrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : शासनाच्या शेततळी योजनेतून आडुळ मंडळातील ३६ गावात ६२८ च्यावर शेततळे करण्यात आले आहेत. या शेततळ्यातून कोट्यवधी लिटर पाण्याचा साठा करण्यात होत आहे. ही शेततळी शेतीसाठी उन्हाळ्यात लागणारे पाणी घेण्यासाठी उपयोगी पडत आहेत.

गेल्या तीन दशकांपासून कायम स्वरुपी दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या आडुळ (ता. पैठण) येथील शेतकऱ्यांच्या बागा पाच वर्षांपूर्वी पाण्याअभावी सरपण झाल्या होत्या.परिणामी येथील बागायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली होती.

Farm Pond Scheme
Farm Pond Scheme : मागेल त्याला शेततळे योजनेस लॉटरीचे ग्रहण

त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी विहिरींचे पाणी आटल्यावर पाणी टंचाईच्या काळात फळबागांना पाणी देता यावे म्हणून शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून व वैयक्तिक स्वखर्चातून शेततळे केले. त्यामुळे गेल्या पाच वर्षात आडुळ कृषी मंडळात फळबागांच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली. ही शेततळी या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहेत.

Farm Pond Scheme
Farm Pond Burst : शेततळे फुटल्याने महडला शेतकऱ्यांना मोठा फटका

शेततळ्यात साठा केलेल्या पाण्यावर भर उन्हाळ्यातही हे शेतकरी आपली मोसंबी, डाळिंब बागा तर जोपासतच आहे शिवाय कलिंगड, खरबूज, काकडी, वांगी, टोमॅटो, गवार, कांदा, भेंडी, मिरची, गहु आदी पालेभाज्या व फळभाज्यांच्या माध्यमातून पाण्याची पिके घेऊन आर्थिक उन्नतीकडे वाटचाल करीत आहेत.

शेततळ्यात साठविण्यात आलेल्या पाण्याचा ठिबक सिंचन संचाच्या माध्यमातून योग्य वापर करून अल्प पाण्यावर नगदी पिके घेण्याचा प्रयत्न हे शेतकरी करीत आहेत.

मी पाच वर्षांपूर्वी शेततळे केले. त्यामुळे आज माझ्याकडे 1400 झाडांची डाळिंब बाग झाली. शेततळ्यामुळेच कडक उन्हाळ्यात यंदा साडे सहा लाख रुपयांच्या कलिंगडाचे उत्पादन घेवुन शकलो.
-किरण वाघ, शेतकरी, आडुळ.
आडुळ मंडळातील ६२८ शेतकऱ्यांनी आतापर्यंत शेततळे योजनेचा लाभ घेतला. यातील अनेक शेतकऱ्यांच्या खडकाळ शेतीवर फळबागा फुलल्या आहेत. काही शेतकरी उन्हाळी पिके घेवुन आर्थिक प्रगती साधत आहे.
-अशोक पठाडे, मंडळ कृषी अधिकारी, आडुळ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com