Sugar Factory : ‘पूर्णा सहकारी’ वगळता इतर २८ साखर कारखाने बंद

Sugar Factory Update : नांदेड विभागात पूर्णा सहकारी साखर कारखाना क्षेत्रात ऊस शिल्लक असल्याने या कारखान्याचे अद्याप गाळप सुरु आहे. तर इतर २८ साखर कारखान्यांचा पट्टा पडला आहे.
Sugar Factory
Sugar FactoryAgrowon
Published on
Updated on

Nanded News : नांदेड विभागात पूर्णा सहकारी साखर कारखाना क्षेत्रात ऊस शिल्लक असल्याने या कारखान्याचे अद्याप गाळप सुरु आहे. तर इतर २८ साखर कारखान्यांचा पट्टा पडला आहे. आजपर्यंत या कारखान्यांनी एक कोटी १७ लाख ५८ हजार ५२१ टन उसाचे गाळप तर एक कोटी २० लाख ४७ हजार ६५७ क्विंटल साखरेचे उत्पादन केल्याची माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) सचिन रावल यांनी दिली.

Sugar Factory
Sugar Production : ‘कादवा’ साखर कारखान्याकडून ४ लाख क्विंटल साखर उत्पादन

नांदेड विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यांतून गाळप हंगाम २०२३-२४ साठी २९ कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. यात १९ खासगी, तर १० सहकारी साखर करण्यांचा समावेश होता. हा गाळप हंगाम ता. एक नोव्हेंबरपासून सुरू झाला होता. आजपर्यंत नांदेड विभागातील कारखान्यांनी एक कोटी १७ लाख ५८ हजार ५२१ टन उसाचे गाळप तर एक कोटी २० लाख ४७ हजार ६५७ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

अद्याप गाळपाअभावी ऊस शिल्लक असल्याने वसमत तालुक्यातील पूर्णा सहकारी साखर साखर कारखाना सुरु आहे. इतर २८ कारखाने मात्र बंद झाले आहेत. परभणी जिल्ह्यातील सात कारखान्यांपैकी सात कारखाने बंद झाले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील पाच पैकी चार कारखाने बंद झाले आहेत. तर पूर्णा सहकारी साखर कारखाना वसमत हा कारखाना सुरु आहे. नांदेड जिल्ह्यातील सहापैकी सहा कारखाने बंद झाले आहेत. लातूर जिल्ह्यातील ११ पैकी ११ कारखाने बंद झाले आहेत.

Sugar Factory
Sugar Factory : साखर विक्री कोट्यात कारखान्यांकडून हेराफेरी

सरासरी साखर उताऱ्यात विलास सहकारी साखर कारखाना आघाडीवर

नांदेड विभागात लातूर जिल्ह्यातील तोंडार (ता. उदगीर) विलास सहकारी साखर कारखाना साखर उताऱ्यात विभागात अव्वल आहे. या कारखान्याचा साखर उतारा २०.३१ टक्के आला आहे. या कारखान्याने पाच लाख दोन हजार ९४२ टन उसाचे गाळप केले आहे. तर पाच लाख ९५ हजार ९८० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

कारखानिहाय ऊस गाळप व साखर उत्पादन

(गाळप टनांत साखर उत्पादन क्विंटलमध्ये)

जिल्हा कारखाने ऊस गाळप साखर उत्पादन

नांदेड सहा १९,४१,९३७ १९,३२,६३५लातूर ११ ४९,४०,७२१ ५२,७४,३८२

परभणी सात ३३,३५,५४५ ३३,०६,८४०

हिंगोली पाच १५,४०,३१८ १५,३३,८००

एकूण २९ १,१७,८५,५२१ १,२०,४७,६५७

विभागाचा सरासरी साखर उतारा : ९.९८ टक्के

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com