Sugarcane Crushing : पाच जिल्ह्यांत ९५ लाख ३८ हजार ८७९ टन उसाचे गाळप

Sugarcane Season : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांसह खानदेशातील दोन जिल्हे मिळून पाच जिल्ह्यांत २२ कारखान्यांनी ९५ लाख ३८ हजार ८७९ टन उसाचे गाळप करत सरासरी ८.९१ टक्के साखर उताऱ्याने ८५ लाख २ हजार ८२२ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
Sugarcane
Sugarcane Agrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांसह खानदेशातील दोन जिल्हे मिळून पाच जिल्ह्यांत २२ कारखान्यांनी ९५ लाख ३८ हजार ८७९ टन उसाचे गाळप करत सरासरी ८.९१ टक्के साखर उताऱ्याने ८५ लाख २ हजार ८२२ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. हे गाळप करत असताना २५ मार्चपर्यंत जवळपास १३ कारखान्यांनी आपला गाळप हंगाम आटोपता घेतला आहे.

यंदाच्या उसगाळप हंगामात जळगाव, नंदुरबारमधील प्रत्येकी २, छत्रपती संभाजीनगरमधील ६, जालन्यातील ५, बीडमधील ७ मिळून २२ कारखान्यांनी सहभाग घेतला होता. या सर्व कारखान्यांची प्रतिदिन ऊस गाळप क्षमता ८४ हजार ९० टन इतकी आहे. २५ मार्चला या सर्व कारखान्यांनी सरासरी १३५९ टन उसाचे गाळप केले.

Sugarcane
Sugarcane Season : नागवडे कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता

या एकाच दिवशी कारखान्यांनी सरासरी १३.१७ टक्के साखर उताऱ्याने १७९१० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. दुसरीकडे २५ मार्च अखेरपर्यंत २२ कारखान्यांनी ९५ लाख ३८ हजार ८७९ टन उसाचे गाळप करत ८५ लाख २ हजार ८२२ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. हे उत्पादन करत असताना या सर्व कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ८.९१ टक्के इतका राहिला.

या गाळपात सहभागी १३ सहकारी साखर कारखान्यांनी ४३ लाख ३१ हजार ९९७ टन उसाचे गाळप करत सरासरी ८.३ टक्के साखर उताऱ्याने ३५ लाख ९४ हजार ५८६ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. तर खासगी ९ कारखान्यांनी ५२ लाख ६ हजार ८८२ टन उसाचे गाळप करत सरासरी ९.४३ टक्के साखर उताऱ्याने ४९ लाख ८ हजार २३६ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

Sugarcane
Sugarcane Production : साखर उत्पादनात कोल्हापूर आघाडीवर, यंदाच्या गळीत हंगामात उताऱ्याची टक्केवारी वाढली

जिल्हानिहाय ऊस गाळप ( टनमध्ये) व साखर उत्पादन (क्विंटलमध्ये)

नंदुरबार : जिल्ह्यातील एक सहकारी व एक खासगी मिळून दोन कारखान्यांनी ९ लाख ४४ हजार ६३८ टन उसाचे गाळप करत सरासरी ८.८ टक्के साखर उताऱ्याने ८ लाख ३१ हजार १४९ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. या दोन्ही कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे.

जळगाव : जिल्ह्यातील एक सहकारी व एक खासगी मिळून दोन कारखान्यांनी यंदाच्या गाळपात सहभाग घेतला. या कारखान्यांनी १ लाख ९१ हजार १९७ टन उसाचे गाळप करत १ लाख ७३ हजार ९७७ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. या दोन्ही कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.१ टक्के राहिला. तर दोन्ही कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम आटोपला आहे.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील तीन सहकारी व तीन खासगी मिळून सहा कारखान्यांनी १८ लाख ७५ हजार ३३५ टन उसाचे गाळप केले. या गाळपातून सरासरी ९.६९ टक्के साखर उताऱ्याने १८ लाख १६ हजार ७२६ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

जालना : जिल्ह्यातील तीन सहकारी व दोन खासगी मिळून पाच कारखान्यांनी २४ लाख ८३ हजार ७२८ टन उसाचे गाळप करत २४ लाख ५१ हजार ९०५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा हा ९.४९ टक्के इतका राहिला.

बीड : जिल्ह्यातील पाच सहकारी व दोन खासगी मिळून सात कारखान्यांनी गाळपात सहभाग नोंदविला. या कारखान्यांनी ३९ लाख ४३ हजार ९८२ टन उसाचे गाळप करत सरासरी ८.१९ टक्के साखर उताऱ्याने ३२ लाख २९ हजार ७५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. जिल्ह्यातील पाच कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com