Sugar Factory : साखर विक्री कोट्यात कारखान्यांकडून हेराफेरी

Sugar Quota Update : मंजूर केलेल्या कोट्याचे उल्लंघन करीत देशातील काही साखर कारखाने साखरेची विक्री करीत असल्याचे केंद्राने केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे.
Sugar Quota
Sugar QuotaAgrowon
Published on
Updated on

Pune News : मंजूर केलेल्या कोट्याचे उल्लंघन करीत देशातील काही साखर कारखाने साखरेची विक्री करीत असल्याचे केंद्राने केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे चुकीची माहिती दिल्यास यापुढे अत्यावश्यक कायद्याखाली कारवाई केली जाईल, असा असा इशारा केंद्र सरकारने दिला आहे.

केंद्रीय अन्न मंत्रालयाच्या साखर व खाद्यतेल संचालनालयाने अलीकडेच देशातील साखर विक्रीच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर ही बाब निदर्शनास आली आहे. या मंत्रालयाचे अवर सचिव सुनील कुमार स्वारनकर यांनी सर्व राज्यांच्या सहकार व साखर उत्पादन यंत्रणांच्या सचिवांना एक पत्र पाठविले आहे.

देशातील काही साखर कारखाने मासिक साखर विक्री कोट्याचे सर्रास उल्लंघन करीत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. राष्ट्रीय एकल खिडकी प्रणालीत (एनएसडब्ल्यूएस) कारखान्यांकडून हेतुतः काही माहिती भरली जात नसल्याचे देखील आढळले आहे, असे केंद्रीय अवर सचिवांच्या पत्रात म्हटले आहे.

“साखर कारखान्यांनी नोव्हेंबर २०२३ व जानेवारी २०२४ या दरम्यान साखर विक्रीच्या वस्तू व सेवा कराची (जीएसटी) तपासणी केली. केंद्रीय साखर संचालनालयाने केलेल्या चौकशीत काही कारखान्यांनी साखर विक्रीचा तपशील योग्य प्रकारे नमूद केलेला नसल्याचे आढळले आहे.

Sugar Quota
Sugar Factory Quota : कारखान्यांच्या साखर कोट्यात सलग दुसऱ्या महिन्यात वाढ

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने ठरवून दिलेल्या प्रणालीत कर भरणा व माहिती देणे कायद्याने बंधनकारक आहे. परंतु कारखान्यांनी ही माहिती दिलेली नाही. त्यामुळे देशांतर्गत बाजारातील साखर विक्री व्यवहाराचे मूल्यमापन करण्यात अडचणी आलेल्या आहेत,” असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

‘साखर नियंत्रण आदेश १९६६’मधील पाचव्या कलमानुसार साखर विक्रीची संपूर्ण माहिती साखर कारखान्याने सादर करणे बंधनकारक आहे. यापुढे बिनचूक व योग्य माहिती केंद्रीय प्रणालीकडे सादर न केल्यास ‘साखर नियंत्रण आदेश व अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५’ मधील तरतुदींचा आधार घेत आम्हाला कारवाई करावी लागेल, असा इशारा केंद्राने याच पत्रात दिला आहे.

दरम्यान, साखर उद्योगातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, देशात १४ राज्यांमध्ये साडेचारशेहून अधिक साखर कारखाने आहेत. त्यामुळे कायद्याचे उल्लंघन करीत नेमके कोण साखर विकते आहे हे केंद्राने जाहीर करायला हवे. महाराष्ट्रातील बहुतेक साखर कारखाने नियमानुसार साखर कोट्याचा अवलंब करीत आहेत. कोट्याच्या बाहेर जात साखर विक्री होण्याची शक्यता उत्तर प्रदेशात आहेत. त्यामुळे केंद्राने या प्रकरणात संभ्रम न तयार करता थेट माहिती जाहीर करावी

Sugar Quota
Sugar Production : देशात ३१८ लाख टन साखर उत्पादनाची शक्यता
आमच्याकडून उल्लंघन नाही“साखर कारखान्याचा अध्यक्ष म्हणून २८ वर्षे मी राजारामबापू साखर कारखान्याचे काम केले. आम्ही कधीही कर बुडवून अथवा केंद्राचे आदेश धुडकावून साखर विक्रीचे व्यवहार केलेले नाहीत. केंद्र मागेल तेव्हा आम्ही हवी ती माहिती देण्यास तसेच कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यासदेखील तयार आहोत.”
पी. आर. पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाने संघ

साखरेचे धोरण ठरविण्यात अडचण

सध्या होणारे साखर उत्पादन व विक्रीची संभाव्य परिस्थिती पाहता येत्या कालावधीत साखर उद्योगावर काही निर्णय होणे अपेक्षित आहे. यासाठी केंद्र साखर विक्रीची तत्परतेने नोंद घेत आहे. या पार्श्‍वभूमीवर खरी माहिती कळावी, यासाठी केंद्राने कारवाईचा बडगा उगारला आहे. साखर विक्रीबाबत संशयास्पद माहिती येत असल्याने केंद्राला साखरेचे धोरण ठरविणे अडचणीचे झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com