Exam Fee Waiver : दुष्काळामुळे परीक्षा शुल्कमाफी, पण ८८१ विद्यार्थ्यांनाच लाभ

Exam Fee Update : दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी मिळणार आहे.
No Exam Fee
No Exam FeeAgrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, बार्शी, माढा, माळशिरस, सांगोला या पाच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून, उर्वरित तालुक्यांमधील बहुतेक महसूल मंडलांमध्ये दुष्काळसदृश स्थिती जाहीर झाली आहे. दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी मिळणार आहे.

मात्र जिल्ह्यातील दहावी-बारावी परीक्षेसाठी बसलेल्या एक लाख १८ हजार ६१९ पैकी केवळ ८८१ विद्यार्थ्यांनाच शुल्क परत मिळणार आहे. त्यांची यादी माध्यमिक शिक्षण विभागाने पुणे बोर्डाला पाठविली आहे.

No Exam Fee
Water Scarcity : उरणमध्ये आठ गावांत पाणीप्रश्‍न ऐरणीवर

राज्यातील दुष्काळामुळे राज्य शासनाने दहावी- बारावीतील विद्यार्थ्यांचे (दुष्काळग्रस्त तालुक्यातील) परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता यासाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी बोर्डाला सादर करण्याचे आदेश सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे केवळ अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांनाच परीक्षा शुल्क परत मिळणार आहे.

No Exam Fee
Loan Recovery : शेतकऱ्यांच्या बचत खात्यांवरील निर्बंध उठवा

सोलापूर जिल्ह्यात इयत्ता बारावीसाठी ५२ हजार ८७०, तर दहावीसाठी ६५ हजार ७४९ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले आहेत. जिल्ह्यातील पाच तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला असून, इतर तालुक्यांतील बऱ्याच महसूल मंडळांमध्ये देखील दुष्काळसदृश स्थिती जाहीर झाल्याने त्या सर्वांनाच शासनाच्या सवलतींचा लाभ देण्यात येत आहे. मात्र परीक्षा शुल्क माफीस केवळ दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यातील विद्यार्थीच पात्र असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील ८८१ विद्यार्थ्यांची यादी प्राप्त झाली असून, ती माहिती पुणे बोर्डाला सादर केली आहे. तरी पण कोणीही विद्यार्थी या लाभापासून वंचित राहू नये म्हणून सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पुन्हा एकदा पत्र देऊन माहिती घेतली जाईल. कोणी विद्यार्थी वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापकांची राहील.
सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com