Loan Recovery : शेतकऱ्यांच्या बचत खात्यांवरील निर्बंध उठवा

Restriction On Bank Account : जिल्ह्यात यंदा दुष्काळ सदृश स्थिती घोषित करण्यात आलेली असताना जिल्ह्यातील भारतीय स्टेट बँकेच्या (एसबीआय) शाखा तसेच इतर बँकांकडून पीककर्जाची वसुली करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बचत व चालू खात्यावर निर्बंध घातले आहेत.
Crop Loan Recovery
Crop Loan Recoveryagrowon
Published on
Updated on

Parbhani News : जिल्ह्यातील भारतीय स्टेट बँकेसह (एसबीआय) अन्य बँकांनी शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर घातलेले निर्बंध (होल्ड) उठविण्याच्या सूचना बँक व्यवस्थापकांना दिल्या आहेत, अशी माहिती अग्रणी बँक व्यवस्थापक उदय कुलकर्णी यांनी दिली.

जिल्ह्यात यंदा दुष्काळ सदृश स्थिती घोषित करण्यात आलेली असताना जिल्ह्यातील भारतीय स्टेट बँकेच्या (एसबीआय) शाखा तसेच इतर बँकांकडून पीककर्जाची वसुली करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बचत व चालू खात्यावर निर्बंध घातले आहेत.त्यामुळे बचत खात्यातून पैसे काढता येत नाहीत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Crop Loan Recovery
Loan Recovery : वसुलीसाठी सोसायट्यांचा शेतकऱ्यांकडे तगादा

त्यामुळे बँक खात्यावरील निर्बंध (होल्ड) उठवावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. त्यानंतर जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांनी जिल्ह्यातील बँकांना दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केलेला शासन निर्णय पाठविण्यात आला आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

Crop Loan Recovery
Crop Loan Recovery : पीक कर्जात व्याज वसुलीचा आग्रह नको

परभणी जिल्ह्यातील सर्व ५२ मंडळांत दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. त्यानुसार या मंडळांमध्ये शेतीशी निगडीत कर्जवसुलीस स्थगिती ही सवलत लागू करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे. या सवलतीचा लाभ या मंडळांतील शेतकऱ्यांना मिळायला हवा.

परंतु भारतीय स्टेट बँकेच्या मानवत शाखेकडून पीककर्ज भरू न शकणाऱ्या शेतकऱ्यांच्या बचत व चालू खात्यावर निर्बंध लावले आहेत. त्यामुळे खात्यावरील जमा रक्कम काढता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी येत आहेत. पीकनुकसानीची मदत, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गतची मजुरीची रक्कम खात्यातून काढता येत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com