Pune APMC Scam
Pune APMC ScamAgrowon

Pune APMC Scam: पुणे बाजार समितीचा गैरव्यवहार विधान परिषदेत गाजला

Maharashtra Assembly Session: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या दोन वर्षांत झालेल्या विविध गैरव्यवहारांची चौकशी करून कारवाई करण्याची घोषणा पणनमंत्री जयकुमार रावल यांनी गुरुवारी (ता. १०) विधान परिषदेमध्ये केली.
Published on

Pune News: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या दोन वर्षांत झालेल्या विविध गैरव्यवहारांची चौकशी करून कारवाई करण्याची घोषणा पणनमंत्री जयकुमार रावल यांनी गुरुवारी (ता. १०) विधान परिषदेमध्ये केली.

बाजार समितीमधील गैरव्यवहारांची जत्रींच माजी पणनमंत्री सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेमध्ये वाचून दाखविली. यावर पणनमंत्री रावल यांनी चौकशीची घोषणा केली. ‘आमदार पद नको पण बाजार समितीचे संचालक पद हवे’, असे सांगत भ्रष्टाचारासंबंधीचे गांभीर्य आमदार खोत यांनी सभागृहामध्ये मांडले.

Pune APMC Scam
Pune APMC Scam: बाजार समिती संचालकांची ‘ईडी’मार्फत चौकशी करा

या वेळी फुलबाजारात प्रतीक्षायादी डावलून संचालकांच्या नातेवाइकांना दिलेले परवाने, भुसार बाजार आणि फळबाजारात टाकण्यात आलेल्या टपऱ्या, पेट्रोल पंप चालविण्यास देणे आदी विविध विषयांची यादी वाचली.

Pune APMC Scam
Pune APMC Scam: पुणे बाजार समितीच्या गैरव्यवहारांची नव्याने चौकशी

यावर पणनमंत्री रावल यांनी सर्व ठेके, परवाने कंत्राटे रद्द करण्यात येतील. तसेच यासाठी उच्चस्तरीय समिती नेमून दोन महिन्यांत चौकशी पूर्ण करून दोषींवर कारवाई केली जाईल, अशी घोषणा केली. आमदार खोत म्हणाले, की फुलबाजारातील प्रतीक्षायादी डावलून दिलेल्या परवान्यांची चौकशी सुरू असतानाच पुन्हा ५६ परवाने दिले आहेत.

चौकशी करण्यासाठी पणन संचालक टाळाटाळ का करत आहेत. पेट्रोलपंप हा कोणतीही निविदा न काढता चालवायला दिला आहे. हवेली तालुक्यातील पेरणे येथील दहा एकर जागा ताब्यात नसताना केवळ मोजणीसाठी तब्बल ५३ लाख रुपये खर्च केला आहे. मांजरी येथील उपबाजारात पणन संचालकांची कोणतीही परवानगी न घेता इमारतीची तोडफोड करून गाळ्यांची निर्मिती केली आहे. त्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com