Sericulture Farming : एकेकाळी केली रोजंदारी रेशीम उद्योगातून घेतली भरारी

Silk Production : पुणे जिल्ह्यात बारामतीपासून जवळ असलेल्या साबळेवाडी येथे दत्तू आणि विष्णू या गुळूमकर बंधूंची ३० ते ३२ एकर शेती आहे. पण पाणी व भांडवलाअभावी ती विकसित होत नव्हती. पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी रेशीम उद्योगाचा पर्याय निवडला.
Sericulture
SericultureAgrowon

Sericulture of Silkworm : साबळेवाडीच्या परिसरात सिंचनासाठी पाणी कमी आहे. इतर बागांच्या तुलनेत तुतीला पाणी कमी लागते. शिवाय दरमहा शाश्वत उत्पन्न देणारा हा उद्योग असल्याने आणि तुतीची एकदा लागवड केली की १२ ते १५ वर्ष लागवडीचा खर्च येत नसल्याने शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाचा पर्याय स्वीकारला आहे. त्यामुळे चालू वर्षी पाणी टंचाईच्या काळातही हा उद्योग यशस्वीरीत्या चालू आहे.

पुणे जिल्ह्यात बारामती शहरापासून वीस किलोमीटरवर साबळेवाडी गाव आहे. लोकसंख्या सुमारे १५०० च्या आसपास आहे. गावातील दत्तू सीताराम गुळूमकर आणि बंधू विष्णू यांची वडिलोपार्जित ३२ एकर शेती आहे.

या भागात पाण्याचा प्रश्‍न असल्याने शेती जिरायती होती. पुरेसे आर्थिक उत्पन्न नव्हते. त्यामुळे बरीच शेती पडीक ठेवली होती. ही साधारण पंधरा, सोळा वर्षांपूर्वीची गोष्ट. अशावेळी गुळूमकर बंधूंना रेशीम उद्योगाचा मार्ग सापडला. आणि तिथून शेतीची आणि कौटुंबिक अर्थव्यवस्थेची वाट सुकर झाली.

Sericulture
Sericulture Farming : वाशीम जिल्ह्यात रेशीम शेतीकडे वाढतोय कल

रेशीम शेतीला सुरवात

दोन एक तुतीच्या लागवडीतून रेशीम शेतीला सुरवात झाली. अनुभवातून एकेक सुधारणा करण्यास सुरवात केली. अडीच फुटांवर असलेल्या लागवडीतील अडचणी लक्षात आल्यानंतर साडेचार फुटी सरीचा अवलंब केला. सध्या तुतीखालील क्षेत्र पाच एकरांवर आहे.

एकदा लागवड केल्यानंतर पुढील दहा ते पंधरा वर्षे फारशी अडचण येत नाही. त्यामुळे दरवर्षी पीकबदल नसल्याने खर्चात बचत झाली आहे. वर्षातून एक किंवा दोन वेळा शेणखताचा वापर केला जातो.तुतीवर रोग- किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होत असल्याने फवारणीचा खर्चही अन्य पिकांच्या तुलनेत कमी असतो.

प्रशिक्षण

रेशीम उद्योगातील रीतसर प्रशिक्षण घेतल्यास त्यातील बऱ्याच अडचणी दूर होऊ शकतात. या उद्योगातशेतकऱ्यांना किचकट ठरणारी बाब असते ती म्हणजे कीटकांची चॉकी अवस्था उपलब्ध होणे.

कुशल प्रशिक्षणाची गरज ओळखून दत्तू यांनी जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात तीन ते चार दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले. एच. एस. मुलानी यांचे मार्गदर्शन मिळाले. सुमारे पंधरा ते सोळा वर्षांपासूनचे असलेले सातत्य, कुटुंबातील सर्व सदस्यांची मेहनत व चिकाटी यातून आज गुळूमकर कुटुंब या उद्योगात चांगल्या प्रकारे स्थिरावले आहे.

Sericulture
Sericulture : टसर रेशीम शेती नावीन्यपूर्ण शाश्वत उद्योग

असे आहे रेशीम शेतीतील व्यवस्थापन

५० बाय २२ फूट, १२० बाय २४ फूट व १५० बाय २२ फूट अशा आकाराची तीन शेडस.

पैकी सध्या दोन शेडमध्येच घेतले जाते उत्पादन. शेडस उभारणीसाठी सुमारे दहा ते बारा लाख रुपयांपर्यंत खर्च.

राजगुरुनगर येथील रेशीम शेती व्यावसायिकाकडून चॉकी घेण्यात येतात.

वर्षभरात सुमारे ८ ते ९ बॅचेस घेतात. ४०० ते ४५० अंडीपुंजाची एक व तीनशे ते ३५० अंडीपुंजांची

एक अशा दोन टप्प्यांत होते बॅचचे नियोजन.

सुमारे २२ ते २५ दिवसानंतर कोष तयार होण्यास सुरवात झाल्यानंतर अळ्यांवर चंद्रिका जाळी अंथरण्यात येते. त्यानंतर जाळीवरील कोष काढणी सुरू होते. त्यासाठी रोजंदारीवरील ८ ते १० महिलांची मदत घेतली जाते. त्यांना प्रति दिन ३०० रुपये देण्यात येतात.

अळ्यांचा रोग- किडींपासून बचाव करणे अत्यंत गरजेचे असते. त्यासाठी शेडमध्ये स्वच्छता व निर्जंतुकीकरण केले जाते. अळ्यांच्या प्रत्येक अवस्थेत पुरेसे 'स्पेसिंग ठेवण्यात येते.

उत्पादनवाढीत ही बाब महत्त्वाची असल्याचे गुळूमकर सांगतात.

सध्या तापमान जास्त आहे. मात्र तुषार सिंचन किंवा तत्सम व्यवस्था उभ्या करून

बॅचचे नियोजन केले जात आहे.

उत्पादन व अर्थकारण

दत्तू सांगतात की प्रति १०० अंडीपुंजांपासून ८०, ९०, १०० किलोपर्यंत रेशीम कोष उत्पादन मिळते. कधी बारामती, कधी रामनगर (कर्नाटक) येथे कोषांची विक्री होते. कधी व्यापरी जागेवर येऊन खरेदी करतात. मागील दोन वर्षे कोषांचे दर चांगले म्हणजे प्रति किलो ७०० ते ८०० रुपयांपर्यंत होते.

यंदा मात्र ते ४०० ते ४५० रुपयांपर्यंत आहेत. प्रति बॅच २५ हजार ते ३० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. आजवर कमाल दर ८२५ रुपये मिळाल्याचे दत्तू यांनी सांगितले. रेशीमशेतीसाठी शेड उभारणी, लागवड व अन्य खर्चांसाठी एकूण सुमारे चार ते साडेचार लाखांपर्यंत अनुदान मिळाले आहे.

रोजंदारीवरील दिवस पालटले

दत्तू म्हणाले की एकेकाळी पाण्याअभावी बरीच शेती पडीक ठेवावी लागल्याने रोजंदारीवर जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यावेळी दिवसाला २५ रुपये हजेरी मिळायची. पाच-सहा वर्षे असा संघर्ष केला.

आता रेशीम शेतीने दिवस पालटले आहेत. शेतीपेक्षा या उद्योगातून ताजे उत्पन्न मिळत आहे. पडीक शेती विकसित करणे, अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली आणणे उद्योगातील उत्पन्नातून शक्य झाले. विहीर, बोअर, मोटर आदी सोयी करता आल्या. दोन भावांची दोन सुंदर घरे झाली. घरातील पाच मुलांना चांगले शिक्षण देता आले. एक मुलगी वैद्यकीय शिक्षण घेत आहे.

दत्तू गुळूमकर - ९९६०१०४६६५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com