Nanded News : आठ दिवसांवर येऊन ठेपलेल्या बिलोली व कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या रणधुमाळीस आता वेळ आला असून दोन्ही गटाकडून मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवर भर दिल्या जात आहे.
या दोन्ही बाजार समितीवर काँग्रेस व मित्रपक्षांची एक हाती सत्ता येईल अशी चर्चा होत असली तरी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकनाथ शिंदे गटाने तालुक्यात आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे निकालानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
तब्बल बारा वर्षानंतर होऊ घातलेल्या बिलोली व कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुकीसाठी (ता.सात) ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी प्रारंभी पासूनच अभ्यासपूर्ण व जनसंपर्क असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले आहे.
त्याबरोबरच त्यांचे प्रतिस्पर्धी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व भाजपचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड यांनीही राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना एकनाथ शिंदे गट व अन्य समविचारी मंडळींना सोबत घेऊन तुल्यबळ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहेत. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची व प्रतिष्ठेची होत असल्याचे दिसून येते.
बिलोली कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी खतगावकरांनी त्यांचे पुतणे रवी पाटील खतगावकर यांना ग्रामपंचायत मतदार संघातून उमेदवारी देऊन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाचे दावेदार ठरविणार असल्याचे सांगितले जात आहे.
याशिवाय काँग्रेसकडून बिलोलीत आनंदराव पाटील बिराजदार गुरुजी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिंपळीकर, हनुमंतराव पाटील बामणीकर, यादव कोरनुळे, श्रीराम जाधव, यांना तर शिवसेना ठाकरे गटाकडून शिवकुमार बाबणे परमेश्वर शिवपनोर यांना संधी उपलब्ध करून दिली आहे. आडत व्यापारी मतदारसंघातून अनुदत्त विठ्ठलराव रायकंठवार व शिवशंकर उर्फ नितीन बाबुराव देशमुख यांना उमेदवारी दिली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.