Farmer Loan Waiver : सरकार कर्जमाफी करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

Eknath Shinde : राज्य सरकारने मात्र लाडकी बहिण योजनेसह विविध योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवरील आर्थिक भार वाढल्याचं कारण पुढे करत शेतकरी कर्जमाफी बगल दिली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे.
DCM Eknath Shinde
DCM Eknath ShindeAgrowon
Published on
Updated on

Shetkari Karjmafi News : आमचं सरकार शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करणार आहे, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (ता.१२) दिली. छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारची आत्ता तर सुरुवात झाल्याचं सांगितलं. त्यामुळे पुन्हा शेतकरी कर्जमाफीची चर्चा सुरू झाली आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "निवडणुकीत जो वचननामा दिला त्याची सुरुवात झाली आहे. टप्प्याटप्प्याने पुढे जात आहोत. विविध योजना राबवल्या जात आहेत. त्यासाठी पैसे देत आहोत. जे बोललो ते पूर्ण करणार आहोत. प्रिंटींग मिस्टेक करणार आमचं सरकार नाही. आम्ही जे बोलतो ते करतो." यावेळी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं शिंदे म्हणाले.

DCM Eknath Shinde
Shetkari Karjmafi: पैशाचे सोंग आणता येत नाही

महायुती सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचं आश्वासन विधानसभा निवडणुकीत दिलं. त्यामुळे महायुतीचं सरकार स्थापन झाल्यावर कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु राज्य सरकारने मात्र लाडकी बहिण योजनेसह विविध योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवरील आर्थिक भार वाढल्याचं कारण पुढे करत शेतकरी कर्जमाफी बगल दिली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे.

अलीकडेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन मी दिलं नव्हतं, असं विधान केलं होतं. त्यामुळे महायुती सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची टीका विरोधीपक्षांनी केली. तर विविध जिल्ह्यात शेतकरी कर्जमाफीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले. राज्य सरकार मात्र कर्जमाफीबद्दल भूमिका स्पष्ट करण्यास तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कर्जमाफीवरून हात झटकल्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करण्याची ग्वाही दिली आहे. परंतु शेतकरी कर्जमाफी कधी होणार, याबद्दल सरकार भूमिका घ्यायला तयार नाही. केवळ कर्जमाफीचा चेंडू एकमेकांच्या कोर्टात ढकलून वेळ मारून नेली जात असल्याने शेतकरी मात्र हैराण झाला आहे.

DCM Eknath Shinde
karjmafi: शेतकरी कर्जमाफीवरून अजित पवारांचा घुमजाव

वादळीचा पावसाचा झटका

राज्यात वादळी पावसाने शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या आधाराची गरज आहे. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं सांगितलं. तसेच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com