Farmer Loan waiver: सरकारने ५० हजार कोटींचं कर्ज काढून शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी; एकनाथ खडसे यांची मागणी

Eknath Khadse : मी अर्थमंत्री राहिलो आहे, असं म्हणत खडसे यांनी या सरकारने अर्थसंकल्पात चालखी केल्याची टिका केली. तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ५० हजार कोटी रुपयांचं कर्ज काढून कर्जमाफी करा, अशी मागणी खडसे यांनी विधिमंडळात केली.
Farmer Loan Wavier
Farmer Loan WavierAgrowon
Published on
Updated on

Budget Session 2025 : अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली नाही. औरंगजेबाची कबर, बीडमधील हत्या अशा प्रकरणावर चर्चा झाली. शेतकरी मरतोय त्यावर मात्र चर्चा झाली नाही, अशी टिका शरद पवार राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारवर केली. ते बुधवारी (ता.२६) विधानपरिषदेत बोलत होते. यावेळी खडसे यांनी शेतकरी कर्जमाफी, शेतकरी आत्महत्याकडे सरकारचं लक्ष वेधलं.

मी अर्थमंत्री राहिलो आहे, असं म्हणत खडसे यांनी या सरकारने अर्थसंकल्पात चालखी केल्याची टिका केली. तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ५० हजार कोटी रुपयांचं कर्ज काढून कर्जमाफी करा, अशी मागणी खडसे यांनी विधिमंडळात केली.

खडसे म्हणाले, "राज्य सरकारने ४५ हजार कोटीच्या तुटीचा अर्थसंकल्प सादर केला. ८ लाख कोटींच्यावर राज्य सरकारच्या डोक्यावर कर्ज आहे. पण माझं म्हणणं आहे की, अजून ५० हजार कोटींचं कर्ज काढा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. तुमचा दिलेला शब्द तरी पाळा, करोडो रुपयांचं कर्ज काढलं जातं पण शेतकरी मरतोय." असं म्हणत सरकारवर खडसे यांनी नाराजीही व्यक्त केली.

पुढे खडसे म्हणाले, "अर्थसंकल्पीय अधिवेशन संपत आलं आहे. या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची, शेतकरी आत्महत्या आणि शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या गोष्टींवर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा आहे. पण सरकारने अधिवेशनाचा संपूर्ण वेळ महत्वाचे नाहीत, अशा विषयावर घालवला." अशी टिका सत्ताधारी पक्षावर केली.

शेतकरी कर्जमाफीवरुन खडसे यांनी सरकारवर निशाणा साधला, सरकारने निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. आता मात्र कर्जमाफीचा शब्द काढायला तयार नाहीत. असं म्हणत राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, हे मला माहीत आहे. कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत, असंही खडसे म्हणाले.

Farmer Loan Wavier
CIBIL Score Farming Loans: सीबिल स्कोअरच्या आधारावर पीककर्ज नाकारता येणार नाही; शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा!

दरम्यान, राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकार जाहीर करेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीबद्दल मौन बाळगलं.

राज्यात कर्जबारीपणा वाढल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढू लागल्या आहे. यावरून कॉँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी सोमवारी विधानसभेत सरकारवर टिका केली होती. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी बुधवारी विधानपरिषदेत सरकारला धारेवर धरलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com