CIBIL Score Farming Loans: सीबिल स्कोअरच्या आधारावर पीककर्ज नाकारता येणार नाही; शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा!

Nirmala Sitharaman Loan Announcement: बँका कर्ज मंजुरीसाठी सीबिल स्कोअर पाहू शकतात, मात्र त्याच्या आधारावर कर्ज नाकारू शकत नाहीत. तसेच, दोन लाख रुपयांपर्यंतच्या पीककर्जासाठी कोणतेही तारण आवश्यक राहणार नाही. विद्यार्थ्यांसाठीही मोठा दिलासा देत 7.5 लाख रुपयांपर्यंतचे शिक्षण कर्ज विनातारण मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Nirmala Sitaraman
Nirmala SitaramanAgrowon
Published on
Updated on

Dharashiv News: शेतकऱ्यांना पीककर्ज नामंजूर करताना त्यांच्या सिबील स्कोअरचा आधार घेता येणार नाही. बँकांनी कर्जमंजूर करताना सीबिल स्कोअर विचारात घ्यावा. मात्र, त्याच्या आडून शेतकऱ्यांना पीककर्ज नाकारू नये, असे लेखी उत्तर केंद्रीयमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मांडलेल्या प्रश्नाला दिले आहे. तसे आदेश बँकांना देत दोन लाखांपर्यंतच्या पीक कर्जासाठी बँकांना कोणतेही तारण मागता येणार नाही, असेही केंद्रीय मंत्र्यांनी बजावले आहे, अशी माहिती खासदार निंबाळकर यांनी दिली.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आर्थिक गरजांसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. लोकसभेत खासदार राजेनिंबाळकर यांनी तारांकित प्रश्न क्रमांक ३३१ नुसार पीककर्ज व शैक्षणिक कर्जासाठी शेतकरी व विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींकडे सभागृहाचे लक्ष वेधले. एक वर्षाच्या मुदतीवर तसेच पीक तारणावर दिल्या जाणाऱ्या पीक कर्जासाठी बँकांकडून विविध कारणे पुढे केली जात आहेत.

Nirmala Sitaraman
Farmer CIBIL Score : शेतकऱ्यांना सिबील स्कोअरमुळे पीक कर्ज नाकारता येणार नाही; अर्थमंत्री सीतारामन यांच्या बँकांना सूचना

कर्जासाठी नाठाळपणा दाखवताना बँकांकडून आता शेतकऱ्यांच्या सीबिल स्कोअरचाही आधार घेतला जात आहे. कमी स्कोअर असलेल्या शेतकऱ्यांना बँकांकडून पीककर्ज नामंजूर केले जात आहे. कर्जासाठी तारणही घेण्यात आहे, असे निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले. त्याची दखल केंद्रीयमंत्री सीतारामन यांनी घेत बँकांनी कर्जवाटपाच्या प्रक्रियेत कर्ज माहिती कंपन्यांचा अहवाल अर्थात सीबिल स्कोअर विचारात घ्यावा, मात्र केवळ त्याचाच आधारावर कर्ज नाकारू नये.

तसेच, शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जांवर कोणतीही तारण मागितली जाणार नाही, असे स्पष्ट केले. यासोबत तीन लाख रुपयांपर्यंतच्या पीककर्जासाठी कोणतेही प्रोसेसिंग फी, प्रलेखन शुल्क किंवा इतर सेवा शुल्क आकारले जाणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले. यामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज मिळणे सुलभ होणार आहे. त्यांना त्यासाठी जास्त खर्च येणार नाही, असेही खासदार निंबाळकर यांनी सांगितले.

Nirmala Sitaraman
Crop Loan : गडचिरोलीतील ६१ टक्‍के शेतकऱ्यांकडून पीककर्जाचा भरणा

साडेसात लाखांचे शिक्षण कर्ज विनातारण

बँकांकडून शैक्षणिक कर्ज मंजूर करताना मालमत्ता व अन्य तारण मागण्यात येते. त्यावर केंद्र सरकारने साडेसात लाख रुपयांपर्यंतच्या शैक्षणिक कर्जासाठी कोणत्याही प्रकारच्या तारणाची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले आहे. भारत सरकारच्या शिक्षण कर्जासाठी पतहमी निधी योजनेअंतर्गत (सीजीएफएसईएल) अंतर्गत शैक्षणिक कर्ज हमीदाराशिवाय मंजूर केली जाणार असल्याचेही खासदार निंबाळकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सीतारामन यांनी म्हटले आहे.

यासोबत पीएम विद्यालक्ष्मी योजनेतून देशभरातील ८६० उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना सहज आणि पारदर्शी पद्धतीने कर्ज मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळेल, असे निंबाळकर यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com