Digital Satbara : ‘ई-भूमी अभिलेख’ सर्व्हर अडथळ्यांच्या गर्तेत

Online Stabara : राज्य शासनाच्या ई-भूमी अभिलेख वेबसाइट (सर्व्हर)मध्ये सातत्याने पंधरा दिवसांपासून अडथळे येत आहेत.
Digital Satbara
Digital Satbara Agrowon
Published on
Updated on

Nagar News : राज्य शासनाच्या ई-भूमी अभिलेख वेबसाइट (सर्व्हर)मध्ये सातत्याने पंधरा दिवसांपासून अडथळे येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना डिजिटल सहीचा सातबारा उतारा मिळणे अवघड झाले आहे.

त्यामुळे कर्ज प्रकरणे, खरेदी-विक्री, बक्षीसपत्रे अशी अनेक कामे खोळंबली आहेत. शेतकऱ्यांसह मालमत्ताधारक त्रस्त झाले आहेत. गेल्या १५ दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याने राज्यभरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत.

शेतकऱ्यांना आता प्रत्येक कामासाठी डिजिटल सहीचा सातबारा वापरावा लागत आहे. ई-भूमी अभिलेखच्या सर्व्हरवरून हा सातबारा सेतू कार्यालयात सहजपणे उपलब्ध होतो. मात्र सर्व्हरमधील अडथळ्यांचा फटका शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. डिजिटल सहीच्या सातबाराआधारेच बँकांची कर्ज प्रकरणे, गहाण तारण खत, खरेदी-विक्रीचे व्यवहार, बक्षीसपत्रे, भाडेकरार नोंदविले जातात.

Digital Satbara
Land Record : गेल्या पाच वर्षांतील दस्तनोंदण्या तपासणार

त्यामुळे शासकीय दैनंदिन कामकाजात डिजिटल सातबारा महत्त्वाचा आणि अनिवार्य मानला जातो. परंतु मागील १५ दिवसांपासून ई-भूमी अभिलेख वेबसाइट बंद आहे. केवळ विनासहीचा सातबारा मिळत आहे.

त्यामुळे नागरिकांची अनेक महत्त्वाची कामे खोळंबली आहेत. शेतकऱ्यांसह नागरिकांना सेतू कार्यालय, तहसील कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. तरीही उतारा मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

Digital Satbara
Digital Satbara : सात-बारामध्ये बदल होत असल्यास तत्काळ कळणार

सर्व्हर नेमके कधी सुरू होईल, हे महसूल विभागातील वरिष्ठांनाही सांगता येईना. सध्या खरिपासाठी कर्ज प्रकरणे करण्याचे कामे सुरू आहे. शिवाय खरेदी-विक्री व अन्य नेहमीची कामेही सुरू आहेत. उतारे, कागदपत्रांअभावी अनेकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.

वेबसाइटच्या तांत्रिक अडचणींमुळे डिजिटल सहीचा साताबारा मिळेना झाला आहे. त्यामुळे अडचणीत भर पडली आहे. याबाबत महसूलमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन कामकाज सुरळीत करण्याची गरज आहे.
- शेषराव अपशेटे, शेतकरी, शहरटाकळी, ता. शेवगाव, जि. नगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com