Digital Satbara : सात-बारामध्ये बदल होत असल्यास तत्काळ कळणार

Bhumi Abhilekh : राज्यामध्ये जमिनीसंदर्भात सात-बारा किंवा मिळकत पत्रिकेमध्ये कोणत्याही स्वरूपाचा काही बदल होत असल्यास त्यांची माहिती लगेच समजण्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून पावले उचलण्यात येत आहे.
Digital Satbara
Digital SatbaraAgrowon

Pune News : राज्यामध्ये जमिनीसंदर्भात सात-बारा किंवा मिळकत पत्रिकेमध्ये कोणत्याही स्वरूपाचा काही बदल होत असल्यास त्यांची माहिती लगेच समजण्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून पावले उचलण्यात येत आहे. यासाठी भूमी अभिलेख विभाग नाममात्र शुल्क आकारून ‘नोटिफिकेशन अपडेशन पोर्टल’ची सुविधा लवकरच उपलब्ध करून देणार आहे.

भूमी अभिलेख विभागाने जास्तीत जास्त ऑनलाइन पत्रिकांचे मिळकत डिजिटायझेशन भूमी अभिलेख सात-बारा उताऱ्यातील आहे. याशिवाय बदलाची माहिती सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. त्याचा एक भाग म्हणून ‘अधिकार अभिलेख’ म्हणजे सात-बारा उतारा अथवा पत्रिकांचे मिळकत डिजिटायझेशन भूमी अभिलेख विभागाने केले आहे.

Digital Satbara
Online Satbara : ‘सर्व्हर डाउन’मुळे सातबारा उताऱ्यासाठी शेतकऱ्यांना मनस्ताप

याशिवाय फेरफार उताऱ्यावर शंभर टक्के नोंदी या ऑनलाइन घेतल्या लगेच समजणार जात आहेत. जमिनींच्या मोजणीची ई-नोटीस अर्जदारांना ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी ई-मोजणी व्हर्जन-२ हा पर्यायही उपलब्ध करून दिला जाणार आहे.

Digital Satbara
Satbara Utara : सातबारा उताऱ्यावर वारसा नोंद आता ऑनलाइन, असा करा अर्ज

ई-फेरफार प्रकल्पाच्या राज्य समन्वयक सरिता नरके म्हणाल्या, ‘‘भूमी अभिलेख विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या या सुविधेमुळे एखाद्या जमिनींमध्ये मोजणीच्या माध्यमातून अथवा फेरफारच्या माध्यमातून मालकी हक्कात बदल होत असल्यास त्यांची माहिती संबंधित जमिनींच्या मालकास तत्काळ मिळणार आहे. या बाबतचा प्रस्ताव भूमी अभिलेख विभागाने राज्य सरकारकडे सादर केला आहे. त्यानंतर पोर्टल विकसनास साधारणपणे सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे.’’

राज्य शासनाकडून नाममात्र दर निश्‍चित झाल्यानंतर प्रतिमिळकत दरवर्षी तेवढे शुल्क शासनाकडे जमा करावे लागणार आहे. जेव्हा कधी त्या मिळकतीवर मोजणी माध्यमातून हद्दीत अथवा फेरफारच्या माध्यमातून मालकी हक्कात बदलाबाबत कोणतीही कार्यवाही सुरू असेल, तर त्याचा एसएमएस ही सुविधा घेणाऱ्या व्यक्तीच्या मोबाइलवर येणार आहे. ई-मेल नोंदविला असल्यास त्यावरही माहिती मिळेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com