Land Record
Land RecordAgrowon

Land Record : गेल्या पाच वर्षांतील दस्तनोंदण्या तपासणार

NA Order : दस्तऐवजांचे बनावटीकरण करुन अकृषिक परवानगी देण्याच्या प्रकारांबाबत विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांनी नुकताच आढावा घेतला.

Chhatrapati Sambhajinagar News : दस्तऐवजांचे बनावटीकरण करुन अकृषिक परवानगी देण्याच्या प्रकारांबाबत विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांनी नुकताच आढावा घेतला. त्यानंतर दस्तनोंदणी विभागाकडे १५ ऑगस्ट २०१९ पासूनच्या प्राधिकरण कार्यक्षेत्रातील नोंदणीकृत दस्ताऐवजांची कायदेशीर सत्यता तपासून अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

महानगर नियोजनकार रविंद्र जायभाये, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोलकर, तहसीलदार रमेश मुंडलोड, पैठणचे तहसीलदार सारंग चव्हाण, तहसीलदार कृष्णा कानगुले, खुलताबादचे तहसीलदार स्वरूप कंकाळ, गंगापूरचे तहसीलदार सतिष सोनी, महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या प्रशासन अधिकारी सुनंदा पारवे, सहाय्यक दुय्यम निबंधक राजेश राठोड उपस्थित होते.

Land Record
Land Records Office : अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे मोजणी प्रलंबित

अर्दड म्हणाले, ‘‘महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयासह सबंधित यंत्रणांनी दस्तऐवजांचे बनावटीकरण करुन अकृषिक परवानगी देण्याच्या बाबींना आळा बसावा, या साठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, प्राप्त प्रकरणांची चौकशी करावी व याबाबतचा अहवाल सादर करावा.

महानगराच्या नियोजनबध्द विकासाच्या उद्देशाला व त्या दृष्टीने केलेल्या नियोजनास हे प्रकार प्रतिकूल ठरत आहेत. त्या अनुषंगाने कार्यवाही तातडीने करावी. आपल्या कार्यक्षेत्रात ‘एनए-४४’ साठी उपलब्ध कागदपत्रे मुळ रेकॉर्डला धरून आहेत का, याबाबतही तपासणी करा, असे प्रकार पुढे घडू नयेत, याबाबत दक्षता घ्याव्यात.’’

Land Record
Land Record : जुने दस्त शोधण्यासाठी ‘ई-सर्च २.१’ प्रणाली सुरू

बैठकीत दिलेल्या सूचना

- महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयाने मंजूर केलेल्या रेखांकनातील भूखंडांचीच केवळ खरेदी-विक्री दस्त नोंदणी करावी

- नियमितीकरण न झालेल्या गुंठेवारी भूखंडांची कोणत्याही परिस्थितीत खरेदी-विक्री दस्त नोंदणी करु नये

- दस्त नोंदणी करताना शेतजमीन तुकडेबंदी कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन न होण्याची दक्षता घ्यावी.

- मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी यासंबंधी तपासणी करून नियमित आढावा घ्यावा

- मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधिकरण कार्यक्षेत्रातील १५ ऑगस्ट २०१९ पासून भुखंडाचे नोंदणीकृत दस्ताऐवजांची कायदेशीर सत्यता तपासावी.

अकृषक आदेश, सनदमधील परस्पर फेरबदलाबाबत सूचना

- विकास परवानगी दिलेली नसताना देखील कोणत्या तरतुदीच्या आधारे अकृषक आदेश/सनद देण्यात येतात, याची माहिती सादर करा

- परस्पर बोगस अकृषक सनद/आदेश बनविणाऱ्या विरुद्ध तसेच ते प्राप्त करणाऱ्या विरुद्ध कोणती कायदेशीर कार्यवाही केली जाते, याबाबतची माहिती सादर करा

- बोगस अकृषक आदेशाबाबत परीपूर्ण माहिती तत्काळ सादर करा

- अकृषक सनद निर्गमित करताना संचिकेसह सादर केलेल्या दस्तऐवजांची सत्यता पडताळणी करावी दस्तऐवजांचे प्रमाणिकरण झाल्यानंतरच अकृषक आदेश/सनद द्यावी

- केवळ झोन दाखल्याच्या आधारे तहसील कार्यालयाने कोणतीही अकृषक सनद देऊ नये

- निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी उपरोक्त सर्व बाबींची तपासणी करून नियमित आढावा घ्यावा

अनधिकृत विकास/बांधकाम बाबत सूचना

- तहसिलदारांनी त्यांच्या हद्दीतील अनाधिकृत बांधकामाचा आढावा घ्यावा. प्राप्त, प्रदान अधिकारान्वये अनाधिकृत बांधकामावर कार्यवाही करावी

- तहसिलदारांनी स्वतः च्या कार्यक्षेत्रात सर्वेक्षण फरुन अनधिकृत विकास/ बांधकाम करणाऱ्या बांधकाम धारकास एमआरटीपी अधिनियम १९६६ चे कलम ‘५३’ व ‘५४’ अन्यये विहित मुदतीची नोटीस द्यावी

- विनापरवानगी बांधकाम करत असलेल्या बांधकामधारकांचे एमआरटीपी अधिनियम १९६६ चे कलम ५४ अन्वये काम थांबवणे व त्यांना नियमानुसार संबंधित नियोजन प्राधिकरणाकडून परवानगीबाबत सूचना द्याव्यात

- उक्त प्रमाणे बजावलेल्या नोटीसीनुसार मुदतीत अंमल न केलेल्या बांधकामधारकांची अनधिकृत बांधकामे निष्कासित करावे.

- अनधिकृत बांधकाम निष्कासित न केल्यास संबंधित बांधकामधारकाविरुद्ध एमआरटीपी अधिनियम १९६६ चे कलम ५३ व ५४ अन्वये पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे नोंद करावी.

- तहसीलदारांनी यासंबंधी नियमितपणे कार्यवाही करुन विहित नमुन्यात मासिक अहवाल सादर करावा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com