

Ahilyanagar News : शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून अनेक बाबी शेतकरी आणि शेती विकासासाठी पूरक ठरत आहेत. शेतकऱ्यांना प्रगती करण्यासाठी शेतकरी कंपन्यांचे काम फायदेशीर असून दुधेश्वर शेतकरी उत्पादक कंपनीची प्रगती कौतुकास्पद आहे असे मत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत निमगाव जाळी (ता. संगमनेर) येथील दुधेश्वर शेतकरी उत्पादक कंपनीला भेट देऊन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी पाहणी केली.
संगमनेरचे प्रांतअधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके, नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे, दुधेश्वर फार्मर प्रोडूसर कंपनीचे संस्थापक अध्यक्ष किरण आरगडे, उपकृषी अधिकारी बाळकृष्ण लांबे, रामदास भारती व सहाय्यक कृषी अधिकारी किरण पाटील, सुमीत पुरी यांच्यासह शेतकरी, कंपनीचे सभासद उपस्थित होते.
राज्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांतून शेतकरी हिताचे काम केले जात असून नवीन तंत्रज्ञान, प्रक्रिया, पूरक व्यवसायाला मदत आदींसह विविध बाबी महत्त्वपूर्ण ठरत आहे. कंपनीच्या माध्यमातून एकात्मिक शेती, पूरक व्यवसायाला चालना आणि शेतीचे क्लस्टर उभारून आर्थिक बचत करत शेती उत्पादन वाढवताना त्यासाठीचा उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न यशस्वी होत आहे ही आनंदाची बाब आहे.
यावेळी दुधेश्वर शेतकरी उत्पादक कंपनीने याभागात पूरक व्यवसायाला चालना देत सुरु केलेल्या कुक्कुटपालन खाद्य निर्मिती, व इतर बाबीची जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी पाहणी करत कंपनीच्या कामाचे कौतुक केले.
यावेळी आश्वी बु. येथे राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया भुईमूग या प्रकल्पांतर्गत अनुदानित बियाण्याचे वाटप करत यशस्वी शेतकऱ्यांचा गौरव केला. किरण अरगडे यांनी स्वागत करुन आभार मानले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.