
Travel Difficulties: बसमधील गर्दी पाहून पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करणं खूपच तारेवरील कसरत आहे. केवळ मुंबईमधील लॉकलने प्रवास करतात, त्यांचीच चर्चा करण्यात येतं. पण पुण्यात देखील पीएमटी बसने प्रवास करणं देखील मुंबईमधील लॉकलने प्रवास करण्याएवढं अवघड आहे. एक प्रकारे तारेवरील कसरत आहे. पण ही साधी, सामान्य माणसं कधीच तक्रार करत नाहीत.
जसं असेल तसं स्वीकारत जगन्नाथाचा रथ पुढे ओढत राहतात. बहुतांश ग्रामीण भागातून स्थलांतरीत झालेली सामान्य हाडामासांची माणसं चार पैसे श्रमाने, कष्टाने कमवून उपजीविका भागवणारी आहेत. या माणसांचं विश्व काम, श्रम, कुटुंब असंच आहे. त्यांची मोठी मोठी स्वप्न असतात. मात्र या स्वप्नांची नोंदवत नाहीत की कोणावर लादत नाहीत. पण कधीतरी आपली स्वप्न पूर्ण होतील असं दाखवत नाहीत.
कष्टकरी माणसाचा प्रवास
पुण्यातील डेक्कन कॉर्नर ते घोटवडे फाटा या प्रवासाच्या दरम्यान पीएमटी बसमध्ये खूपच गर्दी झाली होती. कोण प्रवाशी असतील, असा विचार मनात सतत येऊ लागला. अचानक आठवलं ही माणसं दुसरी-तिसरी नसून शहर चालवणारी माणसं आहेत. शहरांना जिवंतपणा देणारी आहेत. उदा. कोणी मजूर आहे, कोणी बिगारी काम करतं. तर कोणी सेवा देण्याचं कामं करतंं, कोणी छोटा व्यवसाय करतंं तर कोणी असंघटित कामगार म्हणून कामं करतंं. असं कोणत्यानं कोणत्या मार्गाने शहर चालवायचे मोठं योगदान देणारी ही माणसं आहेत.
ही माणसं स्वतःच कुटुंब आणि शहर असं दोन्ही स्वतःच्या श्रम,अंगमेहनत आणि सेवा देण्यातून चालवतात. यात केवळ पुरुष आहेत असं नाही, तर यात महिलांचा मोठा सहभाग आहे. महिला शहरातील छोटी, छोटी कामं करतात. उदा. धुणीभांडी, हॉटेलमधील कामं, बांधकाम, सेवा क्षेत्रातील व्यवसाय, कला- कुसरीच्या वस्तू बनवणं, छोटा उद्योग, साफसफाई, घरकाम अशी कितीतरी कामं सांगता येतील, ही कामं या श्रमकरी माणसांशिवाय पूर्ण होऊ शकणार नाहीत.
किंबहुना या कष्टकरी माणसांच्या श्रमावर आधारित आहेत. ही माणसं सामान्य, कष्टकरी, श्रमकरी दिसत असली तरीही क्रांतिकारी आहेत. विकासाचा मूलभूत कणा आहेत. या माणसांचं जीडीपीमध्ये मोठं योगदान आहे, मात्र कधीच दाखवत नाहीत की दावा करत नाहीत. उलट मध्यमवर्गांकडून त्याचं योगदान नाकारलं जातं. योगदान चोरले जातं. या माणसांचं राहणीमान साधं, सामान्य असणं. ही माणसं शहरात नसतील तर शहर चालणे अशक्य होईल. शहरी अर्थकारणाचा डोलारा कोसळेल.
लालपरीमधील अनुभव
सकाळी लवकरच अहिल्यानगरच्या बस स्टँडवर आलो असता, बरीच गर्दी दिसून आली. लालपरी आपली बेस्ट हा विचार डोक्यात घोळत असताना, लालपरी श्रीरामपूर येथून आली तर शिवशाही छत्रपती संभाजीनगर येथील आली. दोन्ही बसेस समांतर उभा राहिल्या. चांगली कपडे अंगात असणारं, तरुण आणि थोडंसं मध्यमवर्गीय असणारे १२ ते १५ जण शिवशाही बसकडं वळले आणि जाऊन बसले. तर १५ ते १६ जण कपड्यांवरून गरीब वाटणारी, वयस्कर, पोशाखावरून कामगार - मजूर असावीत असं लालपरी वळले , तेही जाऊन बसले. पण बसमध्ये बसून प्रवास करण्यात विषमता ही नजरेस भरली.
मी निरीक्षण करत असल्यानं लगेच मनात आलं. हीच ती आर्थिक विषमता, गरीब आणि श्रीमंत यांच्यामधील दरी असलेली. उदा. गरीब, कामगार किंवा सर्वसामान्य यांना पुरेसे पैसे नसल्यानं सुविधा आलेल्या शिवशाहीमध्ये बसता आलं नाही. पण ज्याच्याकडं पैसा आहे त्यांना प्रवासाच्या सुविधा जास्तीचे पैसे मोजून घेता आल्या. नकळतपणे व्यवहारात विषमता पाळली जाते. कोणाला काही सांगायची गरज नाही. व्यवस्थाच विषमतेच्या अंगाने वाटचाल करू लागली आहे. ऐवढेच नव्हे तर विषमता व्यवहारात आणि मासिकतेत बिंबवली जाणं चालू आहे. समता आहे, ती जवळ पैसं असेल तरच समतेचा लाभ मिळेल. नाहीतर आर्थिक घटकांच्या अभावी वंचित रहा.
(लेखक ग्रामीण आणि शेती प्रश्नाचे अभ्यासक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.