IAS Dilip Swami : दिलीप स्वामी छत्रपती संभाजीनगरचे नवे जिल्हाधिकारी

Collector Dilip Swami : छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय यांची पुणे येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी दिलीप स्वामी हे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.
IAS Dilip Swami
IAS Dilip SwamiAgrowon

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय यांची पुणे येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी दिलीप स्वामी हे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. श्री स्वामी आतापर्यंत सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते. गुरुवारी (ता. १५) श्री स्वामी यांनी पदभार स्वीकारला.

प्रभारी जिल्हाधिकारी म्हणून पदभार सांभाळणारे मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्याकडून श्री. स्वामी यांनी आपला पदभार स्वीकारला. जी. श्रीकांत यांनी श्री. स्वामी यांचे स्वागत केले. अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

IAS Dilip Swami
Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणूक बिनविरोध

मावळते जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी महापालिकेत दोन वर्षे मनपा आयुक्त म्हणून काम केल्यानंतर त्यांची बदली छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली होती. आता त्यांची पुणे येथे अतिरिक्त जमाबंदी आयुक्त व अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख या पदावर बदली करण्यात आली आहे.

IAS Dilip Swami
NCP Result : ‘राष्ट्रवादी’ अजित पवारांचीच

त्यांच्या जागी नवे जिल्हाधिकारी म्हणून दिलीप स्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. स्वामी मूळचे मराठवाड्यातील तोंडार, जि. लातूर येथील रहिवासी आहेत. सध्या सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.सोलापुरात त्यांनी कोविड काळात राबविलेल्या माझे गाव कोरोनामुक्त गाव अभियानाची शासनाने दखल घेतली होती हे विशेष.

जिल्ह्यातील टंचाई विषयक उपाययोजना करणे या विषयाला प्राधान्य असेल. त्याच बरोबर जिल्ह्याचे प्रशासन हे गतिमान, पारदर्शक करणे हे उद्दिष्ट असेल.
दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com