Rajya Sabha Election
Rajya Sabha Election Agrowon

Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणूक बिनविरोध

Election Update : राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सहा उमेदवारांनी अर्ज भरल्याने निवडणूक बिनविरोध होणार आहे.

Mumbai News : राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सहा उमेदवारांनी अर्ज भरल्याने निवडणूक बिनविरोध होणार आहे. मात्र एका अपक्षाने अर्ज भरल्याने छाननी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत औपचारिक घोषणेची वाट पाहावी लागणार आहे. संबंधित उमेदवाराच्या अर्जावर १० आमदारांच्या सह्यांची आवश्यकता असल्याने छाननी प्रक्रियेत अर्ज बाद होण्याची शक्यता आहे.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवारी (ता. १५) शेवटची मुदत होती. महायुती आणि महाविकास आघाडीने शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. अर्ज भरण्याआधी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक विधान भवनात झाली. या बैठकीला काँग्रेसचे ३६ आमदार उपस्थित होते. अन्य आमदारांनी व्यक्तिगत कारणांनी अनुपस्थित राहत असल्याचा निरोप गटनेते बाळासाहेब थोरात यांना कळविले.

Rajya Sabha Election
Rajyasabha Candidate : अशोक चव्हाण, देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेसने प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी दिली असून, त्यांनी अर्ज भरण्याआधी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. पटेल २०२२ मध्ये निवडून आले होते. त्यांचा साडेचार वर्षांचा कालावधी शिल्लक असतानाही त्यांना उमेदवारी देऊन धक्कातंत्राचा अवलंब केला. पटेल यांच्या उमेदवारीमुळे दावेदार असलेले सुनील तटकरे, पार्थ पवार, बाबा सिद्दिकी यांची नावे मागे पडली.

सकाळी १० वाजल्यापासून विधिमंडळांच्या आवारात गर्दी झाली होती. शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आणि आमदार वगळता सर्व पक्षांचे आमदार उपस्थित होते. शिवसेनेचे (शिंदे गट) मिलिंद देवरा, भाजपचे अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांचा अर्ज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भरण्यात आला.

Rajya Sabha Election
Election Process : मतदान केंद्रांवर ‘वेबकास्टिंग’द्वारे नियंत्रण

तर काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा अर्ज दाखल करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे यांच्यासह नेते उपस्थित होते.

ठाकरे, पवारांचा उमेदवार नाही

शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर प्रथमच लागलेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली उमेदवार नाही. याआधी हे दोन्ही नेते उमेदवारी जाहीर करत असत. या वेळी समीकरणे बदलल्यामुळे दोन्ही नेत्यांच्या पक्षांना प्रतिनिधित्व करता आलेले नाही.

उमेदवार

अशोक चव्हाण (भाजप)

मेधा कुलकर्णी (भाजप)

डॉ. अजित गोपछडे (भाजप)

मिलिंद देवरा (शिवसेना : शिंदे गट)

प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी काँग्रेस : अजित पवार गट)

चंद्रकांत हंडोरे (काँग्रेस)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com