Agriculture Update : विकसित केलेले वाण शेतकऱ्यांनी वापरावे : कलंत्रे

Sachin Kalantre Managing Director of 'Mahabeez' : नवीन विकसीत केलेले वाण शेतकऱ्यांनी वापरावे व भरपूर उत्पन्न घ्यावे, असे आवाहन ‘महाबीज’चे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे यांनी केले.
Sachin Kalantre Managing Director of 'Mahabeez'
Sachin Kalantre Managing Director of 'Mahabeez' Agrowon

Akola News : नवीन विकसीत केलेले वाण शेतकऱ्यांनी वापरावे व भरपूर उत्पन्न घ्यावे, असे आवाहन ‘महाबीज’चे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे यांनी केले.

Sachin Kalantre Managing Director of 'Mahabeez'
Kharif Review Meeting : पेरण्याआधी बियाणे, खते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचा (महाबीज) ४८ वा वर्धापन दिन विभागीय तथा जिल्हा कार्यालयात झाला. या वेळी कलंत्रे बोलत होते. या वेळी महाबीजचे संचालक डॉ. रणजीत सपकाळ, महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणा संचालक विजय शिराळ, महाबीजचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

जिल्ह्यातील सर्व भागधारक, बीजोत्पादक, शेतकरी व महाबीज विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय व्यवस्थापक जी. जी. देशमुख यांनी केले. कार्यक्रमामध्ये भागधारक, बीजोत्पादक, प्रगतिशील शेतकरी व महाबीज बियाणे विक्रेते यांनी महाबीज करिता केलेल्या विशेष योगदानाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.

Sachin Kalantre Managing Director of 'Mahabeez'
Grape Variety : बदलत्या वातावरणात नवीन द्राक्ष वाण फायदेशीर

मागील ४८ वर्षे शेतकऱ्यांकरिता केलेल्या अविरहीत सेवेबद्दल उपस्थितांनी महाबीजबद्दल समाधान व्यक्त केले. डॉ. सपकाळ यांनी महाबीजच्या प्रगतीमध्ये भागधारक, बीजोत्पादक, शेतकरी, महाबीज विक्रेते, महाबीज अधिकारी व कर्मचारी यांचा मोलाचा वाटा असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाकरिता जिल्हा व्यवस्थापक विजय अस्वार, बीज परीक्षण अधिकारी राजेश पाटील, केंद्र अभियंता सुधीर नेमाने, इतर अधिकारी व कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com