Grape Variety : बदलत्या वातावरणात नवीन द्राक्ष वाण फायदेशीर

Grape Farming : बदलत्या वातावरणात घड जिरणे, घडकुज, मनी चिरणे, बुरशीजन्य रोगास बळी पडणे आदी समस्यांनी पारंपरिक द्राक्ष वाण कालबाह्य होत आहेत.
Grape Market
Grape MarketAgrowon

Nagar News : बदलत्या वातावरणात घड जिरणे, घडकुज, मनी चिरणे, बुरशीजन्य रोगास बळी पडणे आदी समस्यांनी पारंपरिक द्राक्ष वाण कालबाह्य होत आहेत. भविष्यात दर महिन्याला पाऊस होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

तेव्हा द्राक्ष शेतीत बदल करणे गरजेचे असून नुकतेच आलेले नवीन वाण हे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतील. तसेच रंगीत वाणांना निर्यातीस जास्त मागणी आहे. शेतकऱ्यांनी नवीन वाण केल्यास ही शेती फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन द्राक्ष-डाळिंब तज्ज्ञ प्रमोद देशमुख यांनी केले.

‘अॅग्रोवन’च्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त संगमनेर येथील हॉटेल पंचवटी गौरव येथे ‘ॲग्रोवन’ व इंटिग्रेटेड क्विक ॲग्री सोल्युशन प्रा. लि. (आयक्यूएएस) नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या कार्यक्रमात देशमुख बोलत होते.

Grape Market
Arra Grape Variety : ‘आरा’ द्राक्षाला प्रतिकिलो २६० रुपये दर

या वेळी आयक्यूएएसचे डेव्हलमेंट मॅनेजर सचिन फुगट, राहुल रहाणे, संगमनेरच्या श्रीॲग्रो ऑरगॅनिकचे संचालक विनायक पानसरे, रामधन शेळके, दत्तात्रय वर्पे, श्रीपाद सुर्वे, अतुल देशमुख, वसंत शिंदे, विष्णुपंत रहाटळ, संजय देशमुख, राजेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.

देशमुख यांनी सांगितले, की सफेद वाणांना काम जास्त करावे लागते. उत्पादन खर्च एकरी २.५ ते ३ लाख असतो. सफेद आणि कलर वाणांस सारखाच खर्च असतो. मात्र, कलर वाणांस दुप्पट भाव असतो.

Grape Market
Black Grape Variety : काळ्या द्राक्षाचे ‘उत्कर्षा’ वाण विकसित

क्रिमसन, रेडग्लोब तसेच सह्याद्री फार्मने आयात केलेल्या आरा ३५, आरा ३६ आदी वाणांचे महत्त्व व आर्थिक गणिते विषद करून एकरी निव्वळ नफा किमान ५ लाख कसा राहील हे उदाहरणाअंती सिद्ध करून सांगितले. भविष्यकाळात नवे वाण फायदेशीर ठरतील. या वाणांस संजिवके, मजूर कमी लागतात. अवेळी पावसाने मणी चिरण्याची समस्या नाही. जगभर निर्यातीस जास्त मागणी आहे.

फुगट यांनी सांगितले, की कंपनीचे सॉईल इकासान नावाचे उत्पादन दुष्काळसदृश परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. हे उत्पादन त्याच्या वजनाच्या ४०० पट पाणी धरून ठेवते. जमिनीत वापसा कायम ठेवते. तसेच जमीन भुसभुशीत ठेवून उत्पादनात वाढ करते. कंपनीबद्दल व विविध उत्पादनांविषयी माहिती दिली. ‘अॅग्रोवन’चे सिनिअर एक्झिक्युटिव्ह सैफ शेख यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन संतोष देशमुख यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com