Seed Production : आगामी खरिपासाठी ‘महाबीज’ची बीजोत्पादन कार्यक्रम आरक्षण योजना

Kharif Season 2024 : आगामी खरीप हंगामात महाबीजने बीजोत्पादन कार्यक्रम आरक्षण योजना राबवण्याचे जाहीर केले असून शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Seed Production
Seed ProductionAgrowon

Akola News : आगामी खरीप हंगामात महाबीजने बीजोत्पादन कार्यक्रम आरक्षण योजना राबवण्याचे जाहीर केले असून शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बीजोत्पादन कार्यक्रम आरक्षण योजना १० ते ३० एप्रिल या कालावधीत राबविण्यात येत आहे.

महामंडळाकडून प्रत्येक बीजोत्पादन कार्यक्रम आरक्षण योजनेस १९९२-९३ च्या खरीप हंगामापासून वाढता प्रतिसाद आहे. या योजनेमुळे बीजोत्पादक व बीजोत्पादन गावांची निवड करण्यास मदत होऊन आरक्षित बीजोत्पादन कार्यक्रमासाठी वेळेवर पायाभूत बियाणे पुरवठा करणे सुद्धा फायदेशीर झाले आहे. त्याच उद्देशाने महामंडळाने या खरीप हंगामात प्रमाणित तथा पायाभूत बीजोत्पादन कार्यक्रम आरक्षण योजना राबवली जात आहे.

Seed Production
Soybean Seed Production : नागालँड राज्यामध्ये करणार सोयाबीन बीजोत्पादन

कमीत कमी गावांमध्ये जास्तीत जास्त क्षेत्रावर तथा बीज प्रक्रिया केंद्रानजीकच्या गांवामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन आहे. बीजोत्पादन कार्यक्रम आरक्षण योजनेमध्ये ‘गाव’ हा प्रमुख घटक गृहीत धरलेला असून, १०० टक्के क्षेत्र तपासणी करून, तसेच गाव संख्या कमी असल्यामुळे बीजोत्पादकांना वेळोवेळी आवश्यक ते संपूर्ण तांत्रिक मार्गदर्शन करून उत्पादित बियाण्यांची उच्चतम गुणवत्ता राखणे सोईचे होईल, हा उद्देश ठेवण्यात आला.

शंभर रुपये प्रति एकराप्रमाणे आरक्षण रक्कम भरून शेतकऱ्यांना बीजोत्पादन कार्यक्रम आरक्षण योजनेमध्ये सहभागी होता येईल. ‘बीज ग्राम योजने’अंतर्गत महाबीज बीजोत्पादन कार्यक्रमामध्ये ‘गाव’ हा प्रमुख घटक गृहीत असून एकाच गावात जास्तीत जास्त बीजोत्पादन कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे नियोजन आहे. खरीप २०२४-२५ बीजोत्पादन कार्यकम बीज प्रक्रिया केंद्राच्या ५० किलोमीटरच्या परिसरातील गावामध्ये प्राधान्यक्रमाने राबवला जाईल.

Seed Production
Seed Production : ‘महाबीज’चे रब्बी हंगामासाठी ५८७८ हेक्टरवर बीजोत्पादन

एका गावामध्ये पीक, वाण, दर्जा मिळून भाजीपाला पिकांसह कमीत कमी ५० एकर बीजोत्पादन कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. प्रक्रिया, योग्य कच्चे बियाणे, लॉट साइजकरिता तूर, तीळ, ज्यूट वगळून इतर पिकांचा ३ एकरांपेक्षा कमी कार्यक्रम न राबविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

जास्तीत जास्त बीज गुणांक (एसएमआर) प्राप्त होण्याच्या दृष्टीने संपूर्ण पायाभूत बीजोत्पादन कार्यक्रम सुरुवातीलाच योग्य बीजोत्पादक व योग्य क्षेत्राची निवड करून एकाच तालुक्यात राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान तथा तृणधान्य कडधान्याचे उत्पादन वाढ कार्यक्रमांतर्गत नवीन वाणांची बियाणे उपलब्धता वाढविण्याचे दृष्टीने नवीन वाणांचा बीजोत्पादन कार्यक्रमात समावेश केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com