Self-Employment Program : शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी कटिबद्ध : बुवनेश्वरी एस.

Shetkari Aatmabal Program : जिल्हा आत्महत्या मुक्त व बालविवाह मुक्त करण्यासाठी शेतकरी आत्मबल कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होऊन शेतकरीच नव्हे तर जिल्ह्यातील सर्व आत्महत्या थांबविण्यासाठी कटिबद्ध राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी केले.
District Development Committee
District Development CommitteeAgrowon

Washim News : शेतकरी आत्मबल उन्नती कार्यक्रमाची व्याप्ती व विविध स्तरावर नियोजन करून जिल्हा आत्महत्या मुक्त व बालविवाह मुक्त करण्यासाठी शेतकरी आत्मबल कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होऊन शेतकरीच नव्हे तर जिल्ह्यातील सर्व आत्महत्या थांबविण्यासाठी कटिबद्ध राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी केले.

शेतकरी आत्मबल उन्नती कार्यक्रमांतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी श्रीमती वैशाली देवकर, तहसीलदार नीलेश पळसकर, गटविकास अधिकारी श्री खुळे, वाशीम तालुका कृषी अधिकारी अतुल जावळे, कायदा तथा परिविक्षा अधिकारी जीनसाजी चौधरी, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मनोविकारतज्ज्ञ डॉ.श्वेता मोरवाल (ठाकूर), जिल्हा कौशल्य विकास अधिकारी सीमा खिरोडकर यांची उपस्थिती होती.

District Development Committee
Pre-Monsoon Regional Review Meeting : नैसर्गिक आपत्ती, पुरामुळे जीवित हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी

श्रीमती देवकर यांनी सर्व ग्रामस्तरीय समित्यांचे पदाधिकारी यांनी वेळोवेळी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करून सदर कार्यक्रम प्राधान्याने राबविण्याविषयी मार्गदर्शन केले. आत्मबल उन्नती कार्यक्रमाबाबत जागृत राहून प्रशासनास सहकार्य करण्याबाबत आवाहन केले. तर प्रमुख मार्गदर्शक जीनसाजी चौधरी यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि बालविवाह निर्मूलन याविषयी मार्गदर्शन केले.

डॉ. श्वेता मोरवाल यांनी मानसिक आरोग्य आणि शेतकरी मानसशास्त्र याविषयी विस्तृत माहिती दिली तसेच आत्महत्या करण्यापूर्वी मानवीय लक्षणे व मानसिक आरोग्य राखण्यासाठी उपाययोजना याविषयी मार्गदर्शन केले. श्रीमती सीमा खिरोडकर यांनी कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याविषयी मार्गदर्शन केले. अतुल जावळे यांनी बहुपीक पद्धती आणि आंतर पिकाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करताना सोयाबीन एकलपीक घेत असलेल्या क्षेत्रावर शेतकऱ्यांनी बहुपीक पद्धतीचा अवलंब करण्याविषयी आवाहन केले.

District Development Committee
Konkan Agricultural University : विद्यापीठाचे संशोधन तळागाळात पोहोचवू

शेती सोबतच शेती निगडित प्रक्रिया उद्योग उभारणे तसेच शेतकऱ्यांना शाश्वत अर्थार्जन हवे तर शेत निगडित विविध व्यवसाय जसे की रेशीम उद्योग, दुग्ध व्यवसाय, पशुपालन करण्यासंबंधात आवाहन केले. कृषी सहाय्यक महादेव सोळंके यांनी सोयाबीन अष्टसूत्री व शेतीचा कमी खर्च करण्याकरिता विविध उपाय योजना विषय मार्गदर्शन करताना नैसर्गिक शेतीचे महत्त्व सांगितले.

या वेळी पंकज महाले या शेतकऱ्याने सेंद्रिय व नैसर्गिक शेती केल्याने खर्चात बचत व जमिनीच्या आरोग्य सुधारणेबाबत अनुभव कथन केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी शेतकरी आत्मबल वाढविण्याबाबत जनजागृती विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार नीलेश पळसकर यांनी केले. संचालन करीत तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com