Konkan Agricultural University : विद्यापीठाचे संशोधन तळागाळात पोहोचवू

Dr. Sanjay Bhave : कोकण कृषी विद्यापीठात रेडिओ स्टेशन कार्यान्वित करणे, युट्युब, फेसबुक, वार्तापत्र आदींच्या माध्यमातून विद्यापीठाचे संशोधन तळागळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पावले उचलली जातील.
Konkan Agricultural University
Konkan Agricultural UniversityAgrowon
Published on
Updated on

Ratnagiri News : कोकण कृषी विद्यापीठात रेडिओ स्टेशन कार्यान्वित करणे, युट्युब, फेसबुक, वार्तापत्र आदींच्या माध्यमातून विद्यापीठाचे संशोधन तळागळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पावले उचलली जातील, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी दिली. तसेच मागील वर्षभरात विद्यापीठाने साधलेल्या प्रगतीवर समाधान व्यक्त केले.

Konkan Agricultural University
Indian Agriculture : एकत्र या, शेती टिकेल

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा ५२ वर्धापन दिनानिमित्त शनिवारी (ता. १८) आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या निमित्ताने विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर शंभर फूट उंचीच्या ध्वजस्तंभावर ३० बाय २० फूट लांबी रुंदीच्या राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या हस्ते करण्यात आले. अशा प्रकारचा राष्ट्रध्वज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तसेच महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठांमधील सर्वात उंचीचा ध्वजस्तंभ असून विद्यापीठाच्या प्रांगणात तो कायमस्वरूपी फडकत राहणार आहे.

याप्रसंगी विद्यापीठाकडून दरवर्षी देण्यात येणाऱ्या संस्थात्मक पारितोषिकात उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून उद्यानविद्या महाविद्यालय, दापोली, उत्कृष्ट संशोधन केंद्र म्हणून कृषी संशोधन केंद्र, फोडाघाट तर उत्कृष्ट कृषी विस्तार केंद्र म्हणून दापोली येथील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र तर उत्कृष्ट तंत्र विद्यालय म्हणून मत्स्य अभियांत्रिकी पदविका विद्यालय, रत्नागिरी यांना प्रमाणपत्र सन्मानचिन्ह आणि ५ लाखाचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.

Konkan Agricultural University
Agriculture Commodity Market : हळद, तूर, मक्याच्या भावात वाढ

या वेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. प्रशांत बोडके, संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. पराग हळदणकर, कुलसचिव डॉ. प्रदीप हळदवणेकर, संचालक क्रिडा व सहशैक्षणीक उपक्रम डॉ. अरुण माने, नियंत्रक श्रीमती अपर्णा जोईस, विद्यापीठ अभियंता श्री. निनाद कुळकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. संतोष वरवडेकर यांनी केले.

संध्याकाळी डॉ. प्रफुल्ल आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अॅग्रीकॉस प्रस्तुत मेलेडी सिंगर्स हा जुन्या बहारदार गाण्यांचा आॅक्रेस्ट्रा आयोजित केला होता. तसेच लाठी काठी खेळ, विविध नृत्ये, विद्यापीठ महिलांचा खास समूह नृत्याचा आकर्षक कार्यक्रम आणि सर्वांचे लक्ष वेधून घेणारा वस्त्रहरण नाटकाचा तुफान विनोदी नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com