Farmers Protest : दिल्ली सिमेवर शेतकरी ठाम; आज काढणार कँडल मार्च, जाळणार सरकारचा पुतळा

Farmers Protest Shambhu Border : दिल्लीच्या सिमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तिव्र झाले आहे. येथे आणखी एका शेतकरी आंदोलकाचा मृत्यू झाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. तर दिल्लीकडे जाणारा मोर्चा २९ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Farmers Protest
Farmers ProtestAgrowon

Pune News : दिल्लीच्या सिमेवर हमीभाव कायदा आणि इतर प्रमुख मागण्यांवर शेतकरी आंदोलन करत आहेत. यादरम्यान येथे आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ६२ वर्षीय दर्शन सिंह असे मृत शेतकऱ्याचे नाव असून आंदोलकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यामुळे आज शनिवार (२४ रोजी) दर्शन सिंह यांच्यासह इतर तीन मृत शेतकऱ्यांच्या स्मरणार्थ कँडल मार्च काढण्यात येणार आहे. याबरोबरच शंभू आणि खनौरी या दोन्ही ठिकाणी जागतिक व्यापार संघटना, कॉर्पोरेट क्षेत्र आणि सरकारचा पुतळा जाळण्याचा इशारा आंदोलक शेतकरी संघटनांनी दिला आहे.

गेल्या काही दिवसापासून दिल्लीच्या सिमेवर देशातील २५० हून अधिक शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. या संघटना हमीभाव कायद्याच्या अंमलबजावणीसह इतर मागण्यांवर ठाम आहेत. तर रविवारी (१८ रोजी) केंद्र सरकारने सरकारी संस्था शेतकऱ्यांकडून हमीभावाने पाच वर्षांपर्यंत डाळी, मका आणि कापूस खरेदी करतील असा प्रस्ताव दिला होता. मात्र हमीभावासाठी कायदा आणि स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारसी लागू करण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी तो प्रस्ताव फेटाळला होता.

Farmers Protest
Delhi Farmer Protest : आंदोलनात आणखी एका शेतकऱ्यांनं गमवला प्राण!

यादरम्यान दिल्ली येथील आंदोलनात आणखी एका शेतकरी आंदोलकाचा मृत्यू झाल्याने दिल्लीकडे जाणारा मोर्चा २९ फेब्रुवारीपर्यंत थांबवण्यात आला आहे. तसेच याबाबत पुढील रणनीती २९ फेब्रुवारीला ठरवली जाईल, अशी माहिती मजूर किसान मोर्चाचे नेते श्रवण पंढेर यांनी दिली आहे. तसेच त्यांनी, दर्शन सिंह यांच्या मृत्यूवर सर्व शेतकरी दुःखी असून शनिवार (२४ रोजी) कँडल मार्च काढण्यात येईल असे सांगितले आहे.

तसेच २६ फेब्रुवारी रोजी जागतिक व्यापार संघटनेसह कॉर्पोरेट आणि सरकारचाही पुतळा जाळू असा इशारा दिला आहे. तसेच शंभू आणि खनौरी या दोन्ही ठिकाणी २६ फेब्रुवारी रोजी जागतिक व्यापार संघटनेच्या बैठकांचा शेतकऱ्यांवर कसा परिणाम होतो यावर चर्चासत्र आयोजित करू, असेही पंढेर यांनी म्हटले आहे.

खनौरी सीमेवर प्राण गमावलेल्या दर्शन सिंह यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यास पंजाबच्या आंदोलक शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. त्यांनी पैसा नको, न्याय हवा. दर्शन सिंह यांना शहीद दर्जा देवून हरियाणा पोलिसांवरही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.

Farmers Protest
Delhi Farmer Protest : आंदोलक शेतकऱ्यांचे दिल्ली चलो; सरकारचे पुन्हा चर्चेचे आवाहन

संपाचा १२ वा दिवस

एमएसपीच्या कायद्यासह इतर मागण्यांसाठी पंजाबचे शेतकरी दिल्लीच्या सिमेवर आंदोलन करत आहेत. त्यांचा आंदोलनाचा आजचा १२ वा दिवस आहे. दरम्यान आंदोलक शेतकरी दर्शन सिंह यांच्या मृत्यूमुळे दिल्लीकडे जाणारा मोर्चा २९ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. याची घोषणा संयुक्त किसान मोर्चाने केली आहे.

देशभरात कँडल मार्चचे आयोजन

तरूण आंदोलक शेतकरी शुभकरण सिंग याच्यासह ६२ वर्षीय दर्शन सिंह यांच्या मृत्यूमुळे आंदोलकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. यामुळे आज आंदोलनात शहीद झालेल्या चार शेतकऱ्यांच्या स्मरणार्थ कँडल मार्च काढला जाणार आहे. तर हा कँडल मार्च देशभरात काढण्यात येणार आहे.

हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

दरम्यान, पंजाब किसान मजदूर संघर्ष समितीचे सरचिटणीस सर्वन सिंह पंढेर यांनी सांगितले की, खनौरी सीमेवर आणखी एका आंदोलक शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. दिल्ली चलो मोर्चा अंतर्गत सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान मृतांची संख्या ४ झाली आहे. भटिंडा जिल्ह्यातील अमरगढ गावातील ६२ वर्षीय शेतकरी दर्शन सिंह १३ फेब्रुवारीपासून खनौरी सीमेवर राहत होते. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. त्यामुळे पीडित कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com